जळगाव ः प्रतिनिधी
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये काल विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात व फुलांचा वर्षावाने स्वागत करण्यात आले. स्माईली पेन्सीलचे वाटप करण्यात आले. कोरोनानंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष शाळेत येता आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. अनुभूती स्कूलमधील मुख्याधपकांसह सर्वच शिक्षिक शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत केले.
शाळेत पहिल्या दिवसापासून हसत-खेळत शिकता यावे यासाठी अनुभूती स्कूलचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या समाजकल्याणाच्या विचारधारेतून विविध शैक्षणिक उपक्रम शाळेतर्फे राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस कायम स्मरणात राहवा यासाठी भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यशस्वेीतेसाठी शिक्षक- शिक्षकेतर व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.