जळगाव ः प्रतिनिधी
60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रातून मू. जे. महाविद्यालयाच्या ‘ब्लडी पेजेस’ या नाटकास द्वितीय पारितोषिक मिळाले होते.या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती.स्पर्धेची अंंतिम फेरीत 21 मे रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे होणार आहे. यासाठी मूजेचा संघ सज्ज झाला असून कलावंतांचा जोरदार सराव सुरू आहे.
जळगाव केंद्रावर 21 फेब्रुवारी ते 8 मार्च 2022 या कालावधीत छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात राज्य नाट्य मू. जे. महाविद्यालयाचा चमू राज्य नाट्यच्या अंतिम फेरीसाठी सज्ज झाला असून सराव सुरू आहे. संघातील विद्यार्थ्यांना प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य
एस. एन. भारंबे, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक आणि व्यवस्थापन अधिकारी शशिकांत वडोदकर, हास्यजत्रा फेम अभिनेते व नाट्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. हेमंत पाटील,नाट्यकला प्रमुख प्रा. वैभव मावळे, तंत्र सहायक दिनेश माळी, अजय शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
या विद्यार्थ्यांचा सहभाग
शुभांगी वाडिले, सिद्धांत सोनवणे, संदीप तायडे, सुभाष गोपाळ, अभिषेक कासार, दीपक महाजन, उमेश चव्हाण, तेजसा सावळे, प्रज्ञा बिऱ्हाडे, लोकेश मोरे, मंदार देसले, स्वप्निल लहासे, शिवम पाटील, यश सोनवणे.