२१ लाभार्थ्यांना एकूण १५ लाख ७५ हजार रूपयांचे अनुदान

0
22

जळगाव ः प्रतिनिधी
पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अपघाती मृत्यू झाल्यास व अपंगत्व आल्यास राजीव गांधी सानुग्रह विद्यार्थी अपघात सानुग्रह विमा योजनेतून त्यांना ५०ते ७५ हजार रूपयेपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत जिल्हातील २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील राजीव गांधी सानुग्रह अनुदानासाठी जिल्हाभरातून आलेले जवळपास २१ प्रस्ताव शिक्षण विभागात दाखल होऊन प्रलंबित होते.
त्यासंदर्भात दिव्या भोसले यांनी गेल्या २२ऑक्टोबरला जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले होते व लवकर मीटिंग घेऊन पुणे संचनालयाला प्रस्ताव सादर करण्याची विनंती केली.त्यांंनी लगेच २ दिवसात बैठक घेऊन प्रस्ताव सादर केला. त्यानंतर जवळपास ४ महिने त्याचा वेळोवेळी पाठपुरावा केला व १३ मार्चला अनुदान जाहीर झाले.
या योजनेअंतर्गत जिल्हाभरातून आलेले २१ विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यृ झाला होता.यामध्ये पाण्यात बुडून, सर्ंपदंशाने तसेच अपघाताने झालेल्या विद्यार्थांचा समावेश होता. आज त्या सर्व लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेला बोलवून त्यांना प्रति ७५ हजार रुपये असे एकूण २१ लाभार्थ्यांना एकूण १५ लाख ७५ हजार रूपयांचे अनुदानाचा धनादेश सदर कुटूंबास वाटप केला. यावेळी तेथील या योजनेच्या प्रमुख श्रीमती बैसाणे मॅडम उपस्थित होत्या.
सदर कामाचा पाठपुरावा करताना जिल्हाधिकारी अभिजित राऊत व बैसणे मॅडम यांचे अनमोल सहकार्य लाभले त्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजित राऊत व बैसाणे मॅडम यांचे विशेष आभार दिव्या भोसले यांनी मानले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here