हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्या – तालुका काँग्रेस ची मागणी

0
16

जळगाव, प्रतिनिधी । तालुका ग्रामिण काँग्रेस कमिटीच्यावतीने आज उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन यांना निवेदन देण्यात आले.

जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीपिकांचे खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असल्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तालुका काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष मनोज चौधरी, प्रमोद घुगे, सचिन माळी, निलेश बोरा, भाऊसाहेब सोनवणे, भिकन सोनवणे, मुरली सपकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here