हॅकर विद्यार्थ्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट केली हॅक

0
53

मुंबई, वृत्तसंस्था । हॅकर असलेल्या श्रेयस गुजर या विद्यार्थ्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन प्रणालीतील त्रुटी आणि असुरक्षितता दाखवून दिल्या आहेत. विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून लाखो विद्यार्थी, प्राध्यापक, परीक्षा या संदर्भातील संवेदनशील विदा असुरक्षित असल्याची विद्यापीठाला माहिती करून दिली असून, आता संपूर्ण प्रणालीतील त्रुटी दूर करून प्रणाली सुरक्षित करण्यासाठी विद्यापीठाकडून तातडीने पावले उचलली जाणे आवश्यक आहे.

श्रेयस गुजर फर्ग्युसन महाविद्यालयात संगणकशास्त्र शाखेत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. तो प्रमाणित एथिकल हॅकरही आहे. त्याने यापूर्वी विविध कंपन्या आणि केंद्र सरकारसाठीही काम केले आहे. विद्यापीठाच्या प्रणालीत त्रुटी असल्याचे त्याला जून २०२१मध्ये लक्षात आले होते. त्यानुसार त्याने कुलगुरूंचे प्रणालीतील खाते हॅक करून ई-मेलद्वारे ही बाब विद्यापीठाच्या निदर्शनासही आणून दिली. मात्र विद्यापीठाकडून त्याबाबत काहीच प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद देण्यात न आल्याने श्रेयसने डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष विद्यापीठात जाऊन अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर विद्यापीठाकडून या प्रकाराची दखल घेऊन प्रणालीतील त्रुटी दुरुस्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here