जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शिवाजी नगर परिसरातील हरी ओम नगर जवळील नाल्यात आज सायंकाळी 6 ते 7 वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आला.
याबाबत सविस्तर असे की, शिवाजी नगर परिसरातील दत्तात्रय नगरातील रहिवासी गजानन मोहन पवार (वय 41) हे गेल्या 7 तारखेपासून घरातून कुणाला काही एक न सांगता निघून गेले होते. परिवारातील सदस्यांनी शोधले असता सापडले नसल्याने त्यांनी शहर पोलीस स्थानकात हरवल्याची नोंद केली होती. मात्र आज 5 दिवसांनी पवार यांचा मृतदेह घराजवळील नाल्यात आढळला. सापडलेल्या मृतदेह बघून घात आहे की अपघात आहे हे मात्र तूर्तास सांगणे अनुचित नसेल. घटनास्थळी तात्काळ शहर पोलीस स्थानकाचे कर्मचारी पोहोचले होते.