जळगाव : प्रतिनिधी
पुणे येथे गौरा फॅशन क्लब आयोजित ‘वीर महाराष्ट्राचा आणि वीरांगना महाराष्ट्राची 2022’ या सौंदर्य स्पर्धेत जळगावची जीविका मराठे या युवतीने उपविजेतेपद पटकावले. गौरी नाईक आणि जयंत पाटील यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती.
ग्रुमिंग व प्रशिक्षणानंतर ग्रँड फीनालेचा सोहळा बोट क्लब पुणे येथे पार पडला. महाराष्ट्रातील 55 स्पर्धकांनी त्यात सहभाग नोंदवला होता.रोहित खंडेलवाल, अभिनेता मिलिंद गुणाजी, सचिन दनाय, डॉ. दिलीप बोरावके, गौरी नाईक, प्राची भावसार, चैतन्य गोखले व चैताली नेहेते यांनी परीक्षकांचे काम केले. भारत सुरती यांनी मेन्स डिझाइनर पार्टनर व मि. बेनविन कुटिनो यांनी लेडीज डिझाइनर पार्टनर म्हणून सहयोग केले. मेकअप पार्टनर म्हणून अमृता पाटील व सुप्रिया शिंदे यांनी काम पाहिले. महेश सोनी यांनी सूत्रसंचालन केले.