जळगाव ः प्रतिनिधी
पुणे येथे गौरा फॅशन क्लब आयोजित वीर महाराष्ट्राचा आणि वीरांगना महाराष्ट्राची 2022 या सौंदर्य स्पर्धेत जळगावची फाल्गुनी जितेंद्र पाटील यांनी उपविजेतेपद पटकावले आहे. ही स्पर्धा गौरी नाईक व जयंत पाटील यांनी आयोजित केली होती.
स्पर्धेत महाराष्ट्रातून 55 स्पर्धक सहभागी झाले होते. मिस्टर वर्ल्ड रोहित खंडेलवाल, अभिनेता मिलिंद गुणाजी, सचिन दनाय, डॉ. दिलीप बोरावके, गौरी नाईक, प्राची भावसार, चैतन्य गोखले, चैताली नेहेते यांनी परीक्षकांचे काम केले. विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना गौरा यशश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.