विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बुधवारी सोयगावला पंचायत समितीच्या सभागृहात शेवटच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले परंतु या शेवटच्या बैठकीलाही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी दांड्या मारल्याचे बैठकीदरम्यान उघड झाले होते,त्यामुळे सदस्यांनी नाराजीचा सूर काढला असल्याने या गैरहजर यंत्रणांना कारणे दाखवा बजावण्याचा निर्णय घेण्यात आला.
सोयगाव पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण विकासासाठी मार्च अखेरीस आणि कालावधी संपल्याने शेवटची मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत मार्च अखेरीस साठी अखर्चित ग्रामीण विकास निधी,घरकुल योजना यासह इतर यंत्रणांचा आढावा घेण्यात येणार होता परंतु यंत्रणाच्या खुद्द अधिकाऱ्यांनीच या बैठकीकडे पाठ फिरविल्याने बैठकीत काहीच निष्पन्न झाले नव्हते त्यामुळे विकासाचे केवळ कागदोपत्री ठराव घेण्यात येवून कारवाही साठी पाठविण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला त्यामुळे अंतिम बैठकीत घेतलेल्या ठरावांवर विकासाचा विचार करण्यत येईल का असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.बैठकीसाठी सभापती प्रतिभा जाधव,संजीवन सोनवणे,साहेबराव गायकवाड,धरमसिंग चव्हाण,लताबाई राठोड,रास्तुबी पठान,आदी सदस्यांची उपस्थिती होती.
गैरहजर यंत्रणांना करणे दाखवा बजावणार
पंचायत समितीच्या बैठकीला गरीहजर असलेल्या यंत्रणांना तातडीने कारणे दाखवा बजावण्याचे निर्देश गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांनी दिले असून मात्र कारणे दाखवा बजावल्यानंतर मात्र या गैरहजर अधिकाऱ्यांवर खरच कारवाई होईल का अशी शाश्वती खुद्द सदस्यांनाच नव्हती त्यामुळे मार्च अखेरीस निधीत होणारी विकास कामे थंडावणार आहे असे स्पष्ट झाले आहे.