सोयगाव पंचायत समितीच्या इमारतीला नवीन उभारी कधी मिळणार?…..लाखोंचा निधी वाटणाऱ्या या इमारतीच्या नशिबी दारिद्र्याच…….

0
2

विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी

सोयगाव तालुका पंचायत समितीच्या इमारतीची मोठी दुर्दशा झालेली असून पंचायत समितीच्या इमारतीची जागा अपुरी पडते या जुनाट झालेल्या इमारतीमधून पंचायत समितीच्या कामकाजाचा गाडा ओढल्या जातो ग्रामपंचायतींना लाखोंचा निधी वाटप करणाऱ्या या पंचायत समितीच्या इमारतीच्या नशिबी दारिद्र्यच आहे.एकाच छताखाली सर्व कार्यालये या योजनेत सोयगाव पंचायत समितीचा समावेश करण्यात आलेला आहे परंतु अद्यापही या योजनेचा शुभारंभ झालेला नसल्याने जुन्याच इमारतीतून जीव मुठीत घेवून कामकाज सुरु आहे.

पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील कारभार पाहण्यात येतो मात्र तालुक्याचा व्याप बघता व इमारतीची अवस्था बघता पंचायत समितीला प्रशस्त इमारतीची गरज आहे.

जुन्या इमारतीला दुरुस्ती निधीच नाही

दरम्यान पंचायत समितीच्या जुनाट झालेल्या या इमारतीला दुरुस्तीसाठी निधीच मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

चौकट—लहानशा जागेतच संपूर्ण तालुक्याचा कारभार

गेली कित्येक वर्षपासून नवीन सुसज्ज इमारतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सोयगाव पंचायत समितीच्या कार्यालयाचा शासनाने नुकताच एकाच नवीन इमारतीचा प्रस्ताव पाठविलेला आहे.पंचायत समितीच्या समोर प्रशस्त जागा असतांनाही मात्र या इमारतीच्या नवीन कामाला प्रारंभ झालेला नाही.नवीन इमारतीसाठी निधीच नसल्याने अधिकाऱ्यांना व कर्मचार्यांना लहानशा खोप्यात संपूर्ण तालुक्याचा कारभार सांभाळावा लागत आहे.सोयगाव पंचायत समितीवर गेली दहा वर्षापासून शिवसेनेची सत्ता होती.परंतु मागील वर्षात नवीन इमारतीला मंजुरी मिळालेली असतांना अद्यापही निधीच उपलब्ध नसल्याने नवीन इमारतीचे बांधकाम निधी अभावी रखडलेले आहे.तालुक्यातील ४७ ग्राम पंचायतींचा कारभार या पंचायत समितीच्या इमारतीतून चालतो.या पंचायत समितीची गेली कित्येक वर्ष जीनुच इमारत आहे.या इमारतीत पंचायत समितीच्या आस्थापना,लेखा विभागासह ग्राम पंचायत,शिक्षण,आणि कृषी विभागाची कार्यालये चालतात येथील व्याप लक्षात घेता ग्रामीण पाणी पुरवठा हा विभाग मात्र हलविण्यात आलेला असून एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाचे कार्यालय दुसरीकडे हलविण्यात आलेले आहे.मात्र पंचायत समितीची मूळ इमारत लहानशा जागेतच आहे.या ठिकाणी एकच स्वतंत्र आणि सुसज्ज इमारत बांधावी आणि सर्व कार्यालये एकाच छताखाली आणावी असा प्रस्ताव अनेक दिवसापासून पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here