प्रतीनिधी भडगाव
कजगाव ता.भडगाव पंचायत समिती भडगाव श्री. माताजी चॅरिटेबल ट्रस्ट चाळीसगांव प्राथमिक आरोग्य केंद्र कजगाव तर्फे सावित्रीच्या लेकी चा सन्मान दि.१३ रोजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता मान्यवरांच्या उपस्थितीत कजगाव सह परिसरातील २५० महिलांचा पुष्पगुच्छ ट्राफि देऊन सन्मान करण्यात आला
भडगाव पंचायत समिती, श्री.माताजी चॅरिटेबल ट्रस्ट व कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सावित्रीच्या लेकीचा सन्मान यात कजगाव प्राथमिक केंद्रा अंतर्गत येणाऱ्या परिसरातील गावातील
सन्मान सोहळ्यात आशा स्वयंसेविका, बचत गटांच्या महिला,अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका सह कोरोना काळात काम करणाऱ्या महिला सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, ट्राफि देऊन गौरविण्यात आले प्रसंगी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास भडगाव पंचायत समितीच्या सभापती डॉ.अर्चना पाटील उपसभापती रावण भिल्ल डॉ.विशाल पाटील, कजगाव च्या सरपंच वैशाली पाटील सहाय्यक गटविकास अधिकारी संजय लखवाल तालुका वैद्यकीय अधिकारी सुचिता आकोडे कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत पाटील,डॉ.स्वप्नील पाटील, डॉ.संजय पाटील ओम शांती केंद्राच्या चंद्रकला दिदी शिवसेनेचे अनिल महाजन,दिनेश पाटील,आशिष वाणी,माजी सरपंच भानुदास महाजन,उमेद अभियान तालुका व्यवस्थापक प्रशांत महाले,तालुका समन्वय प्रशांत परदेशी, वसुधा पाटील,मथुरा जाधव,नलू परदेशी,अरुणा सोनजे, उज्वला परदेशी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका
बचतगट च्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते
गोंडगाव येथील कन्या लक्ष्मी चौधरी हिची सैन्यदलातील आसाम रायफल मध्ये पोलीस शिपाई म्हणुन निवड झाल्याने लक्ष्मी चौधरी हिचा सत्कार करण्यात आला