सातपुडा पर्वत नामशेष होण्याच्या मार्गावर ; कोट्यावधींची वनऔषधी होतेय नष्ट

0
10

धानोरा ता चोपडा : प्रशांत चौधरी
येथुन जवळच असलेला सातपुडा पर्वतावर वणवा लावण्याच्या घटनेत सध्या वाढ होत आहे.यामुळे येथिल वन्यजीव धोक्यात आहे. औषधी वनस्पती जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर असुन कंदमुळे ही नामशेष होत आहे.हा वणवा थांबला नाही तर वाळवंट होण्यास उशिर लागणार नाही.तर गेल्या बारा वर्षात वनवा लावण्याच्या घटनेत वाढ झालेली आहे.तरी यावर कायमस्वरुपी कायदा करावा अशी मागणी वृक्षप्रेमी करत आहे. साईमत ने गेल्या सात वर्षापासुन दरवर्षी वनवा बाबत बातम्या प्रकाशित केल्यात.तीन वर्षापूर्वी तत्कालीन उपवनसंरक्षक संजय दहीवले यांनी वन सचिवांपर्यंत वनवा रोखण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या.
महाराष्ट्र,मध्यप्रदेश या राज्यांना लागुन सातपुडा पर्वत आहे.गेल्या बारा वर्षांपूर्वी हा पर्वत सुजलाम्- सुफलाम् होता.परंतु काही वनसंहारकांनी नवाड काढायला सुरुवात केली. यात जास्त कष्ट न करता शेती कशी मिळवायची, व तयार करायची याबाबत सातपुडा पर्वतावर जाऊन नवाड तयार केले.उन्हाळ्यात झाडांच्या आजूबाजूला असलेला पालापाचोळा जाळायचा. या आगीत वृक्ष जळतील आणि जागा रिकामी होईल.त्या जागेत शेती करता येईल.या आशेने काही लोक तेथे येऊन हा प्रकार करत असतात. शक्यतो फेब्रुवारी महिन्यापासून हा वनवा सुरू होऊन जून महिन्यापर्यंत असतो.या कालावधीमध्ये या जंगलातील कोट्यावधी रुपयांची औषधी वनस्पती,कंदमुळे हे नाहीसे होत चालले असून बोटावर मोजण्याएवढे शिल्लक असलेले प्राणीही नष्ट होत आहे.
सध्या वनवा लावण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे.वनविभागाने वेळीच कडक कारवाई करुन ही आग वणवा आटोक्यात आणावा अशी परीसरातील वृक्षप्रेमी ची मागणी आहे.सध्या दररोज वनवा लागत असतो.
२५ किलोमीटर वरुन दिसतो वनवा**
सातपुडा पर्वत हा उंचावर असल्यामुळे तेथे लागलेला वणवा हा प्रचंड मोठा असतो.तो जळगाव येथूनही दिसतो.रात्रीच्या वेळी नेहमी येणाऱ्या जाणाऱ्यांना हा वणवा दिसत असतो. सुज्ञ नागरिक तथा वनांचे हितचिंतक वन विभागाशी संपर्क साधत असतात.वनवा एवढा भयानक दिसतो तर आजूबाजूला राहणारे ग्रामस्थ,प्राणी यांचे काय हाल होत असतील असा प्रश्न आहे.याच पर्वतातील पांढरी ते वाघझिरा या पंचवीस किलोमीटर अंतरावरील परिसरात जास्त वणवा लागत असतो.एवढेच नाही तर सातपुड्याच्या पलीकडे देखील हा वणवा दिसतो.
३३ प्रकारची वनसंपत्ती मोठ्या प्रमाणावर नष्ट
या वणव्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यात महत्वपुर्ण खनिज संपत्ती, कंदमुळे, आवळे, बेडा, गुंजपत्ता, हरडा, बाभळीच्या शेंभा, मुसळी, बेलफळ यांच्यासह ३३ प्रकारची वनसंपत्ती ही मोठ्या प्रमाणावर नष्ट झालेली आहे.यात काही वनसंहारक डिंकाच्या झाडाला इंजेक्शन देऊन त्यातुन जास्त डिंक काढतात.यात जास्त करुन धावडी,सलाई ही दोन प्रकारची झाडे आहेत.झाडांना इंजेक्शन दिले असता ते उभेच्या उभे मरुन जातात.दुसरीकडे वन्य प्राण्यांचा राहीवास,खोपे,बिळ हे नष्ट होऊन त्यांच्या जीवनावर मोठे दुष्परीणाम होतो.वणव्यात ते होरपळतात अन्यथा इतरत्र पळुन जातात.
सतत बारा वर्षापासुन वणना अनियंत्रितच
येथिल राहीवाशी व वनप्रेमी यांनी सांगितल्या नुसार तस्करी लोकांनी लावलेल्या वणव्यावर वनविभागाकडून तब्बल बारा वर्षापासुन नियंत्रण करता आले नाही.रात्री आग विझवणे कठीण असते,दरी-खो-यात आग विझवता येत नाही.संबंधित कर्मचारी वरवर आग विझवुन निघुन जातात.पण हळुवारपणे येणाऱ्या वा-यामुळे ही आग पसरत जाते.यामुळे वनवा लागुच नये यावर उपाययोजना शोधणे आवश्यकच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here