सरदार वल्लभभाई पटेल स्कूल मध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धां संपन्न.

0
3

यावल(सुरेश पाटील)
आज दि.5 रोजी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्कूल मध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धां घेण्यात आल्या. कार्यक्रमात यावल पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले सर,भुसावळ येथील नाहाटा कॉलेजच्या प्राध्यापिका सौ.भारती सोनवणे मॅडम व सौ.दिपाली महाजन मॅडम,तसेच साखर कारखाना संचालक मिलिंद नेहते,अनिल महाजन,अतूल उल्हास चौधरी तसेच शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र महाजन तसेच शशिकांत फेगडे इत्यादि मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा शुभारंभ सर्वात प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले.त्यानंतर इयत्त्ता नववीच्या कु.फाल्गुनी विनोद चौधरी व कु.दिक्षा दिनेश महाजन या विद्यार्थिनींनी स्वागत गीत म्हणून प्रमुख अतिथींचे स्वागत केले.
स्वागतगीतानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.प्री – प्रायमरीच्या चिमुकल्यांपासून इयत्ता चौथी पर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांनी या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भाग घेतला.विद्यार्थ्यांनी पारंपारिक तसेच विविध प्रकारच्या वेषभूषा परिधान केल्या होत्या.अनेक विद्यार्थ्यांनी वेषभूषेला अनुसरून मनोगत व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी कुशलतेने आपले कला कौशल्य सादर करून प्रमुख अतिथींची तसेच सर्वच प्रेक्षकांची मने जिंकली . सर्वच विद्यार्थी या स्पर्धेमुळे अत्यंत उत्साहित तसेच आनंदित झाले.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला.सौ. कामिनी बोंडे व सौ.कुंदा नारखेडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व त्यांच्या मार्गदर्शना खाली इयत्ता ६ वी च्या विद्यार्थिनी कु. कृतिका अजय फेगडे,कु.सृष्टी नितीन धानोरे व कु.राजपूर्वा मोरेश्वर फेगडे या विद्यार्थिनिनी कार्यक्रमाचे उत्तमरित्या सूत्रसंचालन करून कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांचा बक्षिस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.सौ.तिलोत्तमा महाजन यांनी स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांची नावे घोषित केली.फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील निवडून आलेले विद्यार्थी व खेळांमध्ये निवडून आलेले विद्यार्थी तसेच विज्ञान प्रदर्शनात प्रथम आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वाटप करण्यात आले.सर्व उपस्थित अतिथिंनी सर्व विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले . कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता 5 वी ची विद्यार्थिनी कु.मयूरी अनिल साळुंखे हिने आभार व्यक्त केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिला तायडे व मुख्य लिपिक प्रशांत फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.मनिषा बडगुजर,सौ.सविता बारी,सौ. सुवर्णा पाटील,सौ.शुभांगी बाऊस्कर मॅडम,सौ.टिना निंबाळे कु.उमेरा शेख मॅडम,कु.धनश्री महाजन,सौ.तृप्ती पवार मॅडम, सौ.योगिता सावळे,सौ.प्रविणा पाचपांडे,सौ.अमृता कुलकर्णी,कु. झीनत शेख,कु.श्रद्धा साळूंके यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करून विशेष सहकार्य केले तसेच कुसूम फालक व सौ.मिनाक्षी वारके यांचे देखील कार्यक्रमास उत्तम सहकार्य लाभले.अशा प्रकारे मोठ्या उत्साहात,शांततेत, खेळीमेळीच्या वातावरणात व फॅन्सी ड्रेस स्पर्धा कार्यक्रम पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here