संतापजनक! पुण्यात बापानंच केला स्वतःच्या मुलीवर अत्याचार

0
54

पुणे : प्रतिनिधी
ओळखीतल्या व्यक्तींकडूनचा होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हिंजवडीत वडिलांकडून स्वतःच्या 12 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. तर कोथरूडमध्ये आईने मानलेल्या भावाने भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण घडले आहे. या दोन्ही प्रकरणांमधील आरोपी फरार आहेत. अद्याप पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आलेले नाही. मात्र आठवडाभरात लैंगिक अत्याचाराच्या चार घटना घडल्या आहेत. अशा अत्याचाराच्या घटनांमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. तर नातेसंबंध कोणत्या थराला गेले आहेत, याचीही गंभीर परिस्थिती समोर आली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची गरज आता व्यक्त होतेय.
शिवाजीनगरातील धक्कादायक घटना
शिवाजीनगर परिसरात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेच्या बाथरूममध्ये नेत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवत आरोपीला अटक केली आहे.पोलिसांनी आरोपीचे स्केच काढले, त्यानंतर त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपास सुरु असताना आरोपी जनवाडी भागातील दारू गुत्यावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकून आरोपीला अटक केली. आरोपीचं नाव मंग्या (वय – 32) असून शाळेत वॉचमन म्हणून काम करता असल्याची माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here