शिक्षक मनोज भालेराव यांचा पुस्तक दिनानिमित्त ’सुरक्षित राहू, पुस्तक वाचू’ उपक्रम

0
2

जळगाव ः प्रतिनिधी
प्रगती विद्यामंदिर शाळेतील शिक्षक मनोज भालेराव यांनी सुरक्षित राहू, पुस्तकं वाचू’ उपक्रमाद्वारे जागतिक पुस्तक दिन साजरा केला.विद्यार्थ्यांना जीवनातील पुस्तक वाचनाचे महत्व समजून सांगण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.ही कोरोना काळाची परिस्थिती बघता विद्यार्थ्यांनी घरी सुरक्षित राहावे व त्यांचा वेळ हा पुस्तक वाचण्यात घालवावा हे उद्दिष्ट ठेवून हा उपक्रम घेण्यात आला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांना जागतिक पुस्तकदिनानिमित्त माहिती मिळावी यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्हाट्स ऍप ग्रुपला जागतिक पुस्तकदिनाविषयी माहिती पाठवून त्यांना ती माहिती वाचन करायला तसेच ती माहिती वहीत लिहून घ्यायला सांगितली व आजच्या दिनी कोणत्याही एका पुस्तकाचे वाचन करायला सांगितले.याद्वारे ’पुस्तक वाचू, सुरक्षित राहू’ हा संदेश देण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सदर उपक्रम हा व्हाट्स ऍप याद्वारे घेण्यात आला असून विद्यार्थ्यांना जागतिक दिनाचे महत्व याद्वारे समजले.या उपक्रमाचे कौतुक विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल व संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई दुनाखे तसेच मुख्याध्यापक शोभा फेगडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here