शिंपी समाजातील एक आदर्श विवाह ः पालकांची प्रगल्भता

0
2

जळगाव ः प्रतिनिधी
सुशिक्षित मुलीने समाजाचा पारंपारिक शिवणकाम व्यवसाय असलेल्या मुलाशी लग्न करून समाजात एक आदर्श घडवला आणि मुलगा सुद्धा उच्चशिक्षित असून नोकरी न करता टेलरिंग या व्यवसायाला प्राधान्य दिले. यावेळी मुलीच्या पालकांचे व मुलीचे कौतुक करण्यात आले अशीच प्रगल्भता जर प्रत्येक पालकांनी ठेवली तर निश्चितच समाजाला एक नवी दिशा मिळेल अशा शब्दात जळगाव शहर शिंपी समाज अध्यक्ष राजेन्द्र कुमार सोनवणे यांनी विवाहप्रसंगी शुभेच्छा दिल्या

जळगाव शहरातील सुप्रसिद्ध अशा रिलायन्स टेलर्स या फर्मचे संचालक राजेंद्र एकनाथशेठ सोनवणे यांचा मुलगा चि. हर्षल व करमुळ पोहरे ता. चाळीसगाव येथील मनोहर नथूशेठ निकुंभ यांची कन्या चि.सौ.का.लक्ष्मी यांचा आदर्श विवाह 10 मे रोजी यश लॉन जळगाव येथे मोठ्या उत्साहात झाला.
यावेळी समाज अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे, उपाध्यक्ष विवेक जगताप, अ.भा.उपाध्यक्ष मुकुंद मेटकर, युवा अध्यक्ष मनोज भांडारकर, प्रशांत कापुरे,सुरेश सोनवणे, ज्येष्ठ समाजसेवक रामकृष्णअण्णा शिंपी,संतोष सोनवणे, पी.टी.शिंपी, धुळे येथील युवा कार्यकर्ते गणेश खैरनार, नितीन बिरारी, संजय निकुंभ व अनेक मान्यवर यावेळेी उपस्थित होते.शिंपी समाजात या आदर्श विवाहाचे खुप कौतुक करण्यात येत असुन असा आदर्श प्रतेकाने घ्यावा असे आवाहन समाज अध्यक्ष यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here