शहरात तरूणाची आत्महत्या

0
2

जळगाव : प्रतिनिधी
शहरातील लक्ष्मी नगरातील ३२ वर्षीय तरूणाने राहत्या घरात ११ मार्च शुक्रवार रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजे दरम्यान गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रशांत हा लक्ष्मी नगरात आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कामाला होता. शुक्रवार ११ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घरातील सर्वजण खालच्या घरात असतांना प्रशांतने वरच्या मजल्यावरील खोलीत गेला. खोली बंद करून गळफास घेवून आत्महत्या केली. प्रशांतने आत्महत्या केल्याची मोठा भाऊ हेमंत मांडोळे याच्या लक्षात आले. आईवडील व नातेवाईकांनी आक्रोश केला. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here