शरीरसौष्ठव स्पर्धेत भुसावळचा डंका ; गुरुमितसिंग ‘जिल्हा श्री’चा मानकरी

0
2

जळगाव ः प्रतिनिधी
जळगाव डिस्ट्रिक्ट बॉडीबिल्डर्स असोसिएशनतर्फे शनिवारी झालेल्या 18व्या जिल्हा श्री 2022 या शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्यात आल्या. यात भुसावळच्या गुरुमितसिंग चहल हा जिल्हा श्री 2022चा मानकरी ठरला. बेस्ट पोझर किताब तुषार जाधव (भुसावळ) तर मोस्ट इम्प्रुड बॉडीबिल्डर्स पुरस्कार अफसर खान (भुसावळ) याने पटकावला. या स्पर्धेत वेन्स जिम्स भुसावळचे वर्चस्व राहिले.
110 स्पर्धकांचा सहभाग
हिंदू महासभेचे डी. एन. तिवारी, संस्थेचे अध्यक्ष मोहन चव्हाण यांनी उद्घाटन केले. जयेश चौधरी, डॉ. कमलाकर पाटील, आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू रवींद्र वंजारी उपस्थित होते. जिल्हाभरातून 110 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
राजेश बिऱ्हाडे, नासीर शेख, भय्या पाटील, अक्षय चव्हाण यांनी पंच म्हणून तर प्रशांत तायडे, विनायक लेकुरवाळे, बॅक स्टेज मार्शल म्हणून जावेद शेख, मोहसीन खान यांनी काम पाहिले. जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी विनोद अग्रवाल, मुस्तफा मकरा, गोपाळ गायकवाड, मुदस्सर पटेल, रोहिदास तायडे, राजेंद्र काळभोर आदी उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेते :-
प्रथम गट : हर्षल तायडे (रावेर), तुषार जाधव (भुसावळ), अफसर खान (भुसावळ), मोहंमद शाहीद (भुसावळ), मोहंमद शाह (वरणगाव). द्वितीय गट : अदनाम अली (सावदा), धीरज जाधव (भुसावळ), नवीन खान (सावदा), लक्ष्मण कोळी (एरंडोल), अझरुद्दीन फारुखी (सावदा).
तृतीय गट : शेख फैजूल (वरणगाव), दानिश खान (भुसावळ), आशिष गोखले (भुसावळ), फैजान शेख (भुसावळ), शेख इस्लामुद्दीन (भुसावळ).
चौथा गट : गुरुमितसिंग चहल, अन्वर खान, धीरज कवरे, (भुसावळ), वैभव सोनवणे (सावदा),
उदयनमुख बॉडीबिल्डर्स स्पर्धा :- सुनील पाटील (जळगाव), मोहसीन शेख (रावेर), अनिकेत खंडेराव (भुसावळ), मुजम्मिल शहा (भुसावळ), रोहन हिवरकर (रावेर).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here