साईमत लाईव्ह प्रतिनिधी वैभववाडी
वैभववाडी I प्रतिनिधी: वैभववाडी रेल्वे स्टेशन मास्तर आणि नापणे गावातील प्रतिष्ठित नागरिक कै.संजय बालाजी शिंगाडे वय ४७ वर्ष यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली.
संजय शिंगाडे मनमिळाऊ होते. त्याच्या या स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच वैभववाडी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.
गेली बावीस वर्षे संजय शिंगाडे हे कोकण रेल्वेत स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत आहेत. पाच वर्षापासून ते वैभववाडी येथील स्टेशनवर स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत होते. प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. रेल्वे प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी ते घेत होते. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांची धडपड होती. आज रात्रीची ड्युटी करून सकाळी घरी आले आणि मित्रांसोबत कोकिसरे बांधवाडी येथील शिंगु देवीच्या दर्शनाला गेले होते. देवीचे दर्शन करून घरी परतत असताना अचानक जमीनीवर कोसळले त्यांना लगेच वैभववाडीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आले मात्र उपचारापुर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. त्यांची पत्नी महिला पोलिस म्हणुन सेवेत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलग असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.