वैकुंठधामाजवळील खड्ड्यामुळे व्यावसायिक व ग्राहकही त्रस्त (व्हिडिओ)

0
14

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील नेरी नाका वैकुंठधामाजवळील नाल्याच्या बाजूस असलेल्या कॉम्प्लेक्स समोरील मुख्य रस्त्यालगत मनपा बांधकाम व आरोग्य विभागाने मोठे खोदकाम करून ठेवल्यामुळे कॉम्प्लेक्स मधील व्यावसायिकांची मोठी पंचाईत झाली असून ग्राहकांना व दुकानदारांना ही बाब अडचणीची ठरत आहे. याकडे मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ह्या खंड्यामध्ये पाईप कधी टाकून मिळणार असा प्रश्न निर्माण झाला.

स्मशाभूमिनजीकच्या मुख्य रस्त्यावर गेल्या चार ते पाच दिवसापूर्वी मनपाच्या आरोग्य व बांधकाम विभागाने 70 ते 80 फुट लांब व खोलवर खड्डा खोदून ठेवला आहे. या परिसरात ड्रनेजमध्ये ब्लॉक आढळून आल्याने हे खोदकाम करण्यात आले मात्र नंतर ह्या खड्डयात पाईप टाकणे आवश्‍यक असतांना त्याकडे मात्र आता दुर्लक्ष करण्यात येत आहे. अशी तक्रार कॉम्प्लेक्समधील व्यावसायिकांनी केली आहे. यासदंर्भात नगरसेवक डॉ.विरेन खडके यांनी चांगले सहकार्य केल्याचेही त्यांनी सांगितले. महापौर जयश्रीताई महाजन यांनी पाहणी करून त्यांनी त्वरीत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. दरम्यान, मनपाच्या अधिकाऱ्यांनी व्यावसायिकांना या खड्ड्यावर स्लॅब टाकून घेण्यास सांगितले, परंतु लॉकडाऊन सारख्या परिस्थितीमुळे ते व्यावसायिकांना शक्य नसल्याने मनपाने पाईप लाईन टाकून हा प्रश्‍न त्वरीत सोडवावा, अशी मागणी व्यावसायिकांनी साईमत लाईव्हशी बोलतांना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here