वेशभूषा, एकांकिकेद्वारे महिलांच्या कर्तृत्वाचे विद्यार्थिनींनी केले कौतुक

0
24

जळगाव : प्रतिनिधी

मेहरूण येथील श्री.संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिनी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा करीत महिलांच्या कर्तृत्वाविषयी माहिती सांगितली. श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे जागतिक महिला दिनी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलीस निरीक्षक योगिता धनगर, डॉ. कोमल पाटील, संस्थेच्या संचालिका अर्चना नाईक, मुख्याध्यापिका शीतल कोळी आदी उपस्थित होते. प्रस्तावनेतून संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक यांनी कार्यक्रमाविषयी माहिती सांगितली. त्यानंतर राजमाता जिजाऊ, विद्येची देवता सावित्रीबाई फुले, झाशीची राणी यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी माल्यार्पण केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या कला सादर केल्या. यात विद्यार्थिनींनी पोलीस निरीक्षक, शिक्षिका, डॉक्टर, सैन्यदलातील जवान यांच्यासह राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, मदर टेरेसा, सानिया मिर्झा यांच्या वेशभूषा करून महिलांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला.तसेच उर्वशी व उत्कर्षा सपके यांनी नृत्यासह ‘जन्म बाईचा’ हि एकांकिका सादर केली. सर्व विद्यार्थिनींचे कौतुक करीत मान्यवरांनी त्यांना सदिच्छा दिल्या. सूत्रसंचालन रुपाली आव्हाड यांनी केले. यावेळी उज्वला नंनवरे, साधना शिरसाठ, आम्रपाली शिरसाट, दिनेश पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here