विद्यार्थ्याला हत्यार दाखवून धमकावणार्‍याला तरुणास अटक

0
17

जळगाव । छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल कॉम्प्लेक्सच्या आवारात हत्याराच्या धाकाने विद्यार्थ्यांना धमकावणार्‍या एका तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल कॉम्प्लेक्स परिसरात गुरूवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास एक तरूण अंदाजे (वय २० ते २५ वयोगटातील) हा नशेत असतांना हातात हत्यार घेवून जाणाऱ्या व येणाऱ्या नागरीक व विद्यार्थी, विद्यार्थींनींना पैसे मागवून धमकावत होता. या वेळी काहीनी त्याला हटकले असता त्यांच्यापाठीमागे लागून त्यांना हत्याराचा धाक दाखत होता. काही नागरीकांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे क्रीडा संकालाजवळ येवून तरूणाला ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here