विजय जैन यांना उत्तर प्रदेश ललित कला अकादमीचा पुरस्कार

0
2

जळगाव ः प्रतिनिधी
जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड मधील कला विभागातील सहकारी विजय जैन यांना उत्तर प्रदेश ललित कला अकादमीच्या दुसऱ्या अखिल भारतीय व्यावसायिक कला प्रदर्शन 2021-22 चा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक जागरूकता आणि जनहित या विषयावर केलेल्या आवाहनानुसार देशभरातील शेकडो व्यावसायिक कलाकारांच्या कलाकृतीमधून या कलात्मक पोस्टरची निवड करण्यात आली आहे. वीस हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य ललित कला अकादमीच्या ऐतिहासिक वास्तूत मान्यवरांच्याहस्ते लाल बारादरी भवन लखनऊ येथे हा पुरस्कार देण्यात येणार आहे. कान्हदेशातील या कलावंताच्या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी त्यांचे कौतूक केले आहे.
प्रदर्शनामध्ये विजय जैन यांच्या दोन पोस्टर्सची निवड करण्यात आली आहे पैकी एक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचे महत्त्व अधोरेखित करणारे व दुसरे मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या पोस्टरला हा पुरस्कार देण्यात आला आहे, ज्यामध्ये लिहिण्याची पाटी आणि आरसा या दोन गोष्टींचा सुंदर मेळ घालत हा कल्पक आरसा विजय जैन यांनी खास तयार करून घेतला आहे.
पोस्टरमधील संकल्पनेबद्दल सांगताना जैन म्हणतात की, ’मुलगी शिकेल तर ती पुढच्या पिढीला शिकवेल आणि ती अशक्य ते शक्य करून दाखवेल अप्लाइड आर्ट मधील ग्रॅज्युएट असलेले विजय जैन हे जैन इरिगेशनमध्ये आर्टिस्ट म्हणून गेली वीस वर्षे आपली सेवा देत आहेत. त्यांच्या सामाजिक विषयावरील अनेक पोस्टर्सना, जसे की स्त्री शिक्षण, बाल मजुर-एक समस्या, पोषक अन्न-चांगला आहार, स्वच्छ भारत, वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण अशा संकल्पनांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पुरस्कृत केले गेले आहे. अप्लाइड आर्ट बरोबर त्यांना फाइन आर्टमध्ये ही अलीकडेच महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, ललित कला अकादमी, तसेच ऑल इंडिया आर्ट अँड क्राफ्ट सोसायटी (दिल्ली)चे पुरस्कारही मिळाले आहेत. ललित कला चोपडा कॉलेजचे प्राचार्य राजेंद्र महाजन, राजू बाविस्कर, विकास मल्हार, शंभू पाटिल यांच्यासह कलाक्षेत्रातील मातब्बरांना विजय जैन यांचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here