वाशिम द्वितीय तर जळगाव तृतीय क्रमांकाचे मानकरी

0
3

जळगाव ः प्रतिनिधी
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश संघटनेद्वारे महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट असोसिएशनच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धा घेण्यात आली. त्यात पुरुष दुहेरीत पुण्याची जोडी प्रथम, वाशिम द्वितीय, जळगाव तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेे.
खान्देशात पाच स्क्वॅश कोर्ट एवढ्या कमी कालावधीत उभारणे आणि त्याला स्पर्धकांनी उदंड प्रतिसाद दिला याबद्दल खेळाडू दयानंद कुमार यांनी आयोजकांचे कौतुक केले. माजी महापौर विष्णू भंगाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित (जिल्हा क्रीडा अधिकारी), अध्यक्षस्थानी केसीई सोसायटी उपाध्यक्ष ड. प्रकाश पाटील, कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, डॉ. प्रदीप खांडे (अध्यक्ष महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशन), दयानंद कुमार, (सहसचिव, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना) व सचिव, महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशन, रंजीत भारद्वाज, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, (सचिव, जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश असोसिएशन) प्राचार्य स. ना. भारंबे, प्राचार्य अशोक राणे उपस्थित होते.

प्रास्ताविक डॉ. बेलोरकर यांनी केले. अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. अखिलेश शर्मा यांनी केले. आभार नीलेश जोशी यांनी मानले. पारितोषिक वितरणाने स्पर्धेचा समारोप झाला.
स्पर्धेतील विजेते असे – 19 वर्षाखालील मुले एकल : प्रकाश अजुणी (ठाणे), आयुष वर्मा (ठाणे), अनिल पासवान (ठाणे). 19 वर्षाखालील मुली एकल : खुशी जसपाल (ठाणे), सेजल कदम (रत्नागिरी), मिर्झा अश्‍मिरा अनिस बेग (औरंगाबाद). 19 वर्ष मुले (संघ) दुहेरी : प्रथम अनुराग देशमुख (औरंगाबाद), वीरेंद्र बहुरे (औरंगाबाद), द्वितीय सुजय सुरडकर (अमरावती), आदेश शिंदे (अमरावती), तृतीय ऋतुराज बोर्डे (वाशिम), श्रेयस खिराडे (वाशिम). 19 वर्ष मुली दुहेरी : प्रथम हिंदवी अशोक गर्जे (औरंगाबाद), सरिता तुळशीराम फुले (औरंगाबाद), द्वितीय गायत्री सुनील गुरव (जळगाव), श्रेया पाटील (जळगाव), तृतीय प्रज्ञा चव्हाण (वाशिम), प्रतिक्षा खडसे (वाशिम).
19 वर्षाखालील मुली संघ
प्रथम ऋचा वारळे, मिर्झा काश्‍मीरा बेग, प्रियंका चाबुकस्वार, अनुजा माटे, नियती गंधपवाड (औरंगाबाद), द्वितीय मानसी मेहरे, रिया कासार, हर्षाली कोठारी, करुणा मोरे, कूंजन म्हस्कर (अमरावती), तृतीय खूशी जसपाल, तिशा गुप्ता, हिनल निमसे (ठाणे), पुरुष एकल : सचिन शिंदे (उस्मानाबाद), राहुल धारा (ठाणे), मोहित तंवर (ठाणे), स्त्री एकल : चेतना जयस्वाल ठाणे मोना चव्हाण (ठाणे) राणी गुप्ता (ठाणे). पुरुष दुहेरी : प्रथम प्रदीप नानेकर (पुणे), आदित्य चोरमारे (पुणे), द्वितीय निशांत पवार (वाशिम), नितीन बोरचाटे (वाशिम), तृतीय शुभम धांगेकर (जळगाव), राहुल पाटील (जळगाव).
मिक्स डबल खुला गट
प्रथम बालू चिलवंत (औरंगाबाद), प्रियंका चाबुकस्वार (औरंगाबाद), द्वितीय योगिता डहाळे (परभणी), गोविंद सोनटक्के (परभणी), तृतीय देवानंद हुलगुंडे (नांदेड), प्रतिक्षा गंगासागर (नांदेड), 19 ते 20 वर्षाखालील मिक्स डबल : प्रथम आदित्य भालेराव (जळगाव), ललिता वाणी (जळगाव), द्वितीय प्रवीण चव्हाण (रत्नागिरी), हर्षाली बागुल (रत्नागिरी), तृतीय सौरभ शिंदे (उस्मानाबाद), गायत्री मालकर (उस्मानाबाद), 21 वर्षाखालील मुले संघ : प्रथम नील पासवान, प्रिन्स यादव, आयुष वर्मा, प्रवीण सानप, अमित गुप्ता (ठाणे), द्वितीय पार्थ शेळके, मिर्झा रेहान बॅग, युवराज सिंग ढोबाड, मंगेश कदम, गौरव गाडेकर (औरंगाबाद), तृतीय वंश गायधने, तनय भूत, रथीइन उमक, अभिषेक शिंदे, वेदांत वाघ (अमरावती)
स्त्री दुहेरी : प्रथम स्नेहल काळे (अमरावती), मोहिनी भेटाल (अमरावती), द्वितीय सिद्धी भोसले, जानवी आत पाडेकर (सांगली), तृतीय प्रियंका पोद्दार (पुणे), रेखा जाधव (पुणे). पुरुष संघ : प्रथम राहुल यादव, राहुल धारा, संताजी पाटील, सूर्यकांत खानसले, उदित शर्मा (ठाणे). द्वितीय अमोल जोनवाल, राजू सिंग (पुराबोल), कृष्णा बढे, अजिनाथ वाणी, गणेश बखाले (औरंगाबाद). तृतीय शिवाजी अठारे, राहुल शिरसाट, युवराज दुखायले, रोहित राठोड, मैनुद्दीन नाईकवाडी (पुणे).
स्त्री संघ : प्रथम मोना चव्हाण, राणी गुप्ता, चेतना जैस्वाल, शृती गुप्ता ,कोमल धारा (ठाणे), द्वितीय रितेशश्री माहीधर, श्रेया कोल्हे, नंदिनी बारस्कर, अश्विनी कल्याणकर, रोहिणी यावले (अमरावती), तृतीय मिर्झा अश्‍मिरा बेग, ऋचा वारुळे, अर्चना गायकवाड, दीपाली आव्हाड, रेखा सागरे (औरंगाबाद).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here