लोणी शिवारात वीज कोसळून बैल ठार, पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांविना शवविच्छेदन रखडले  

0
3

अडावद ता.चोपडा, प्रतिनिधी । येथील पश्चिमेकडील लोणी पंचक धानोरा परीसराला काल दुपारी झालेल्या विजांच्या गडगडाटासह वादळ वाऱ्या सह मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने शेतीपिके नेस्तनाभुत झाल्याने बळीराजांचे उरले सुरले अवसान ही गळाले. त्यात लोणी शिवारातील शेतात दुपारी २.३० वाजेच्या सुमारास विज कोसळून बैल जागेवरच ठार झाला.शेतकऱ्यांचे पन्नास हजारांचे नुकसान झाले.

        लोणी शिवारातील गट क्रमांक १११/१ मधील सुभाष नारायण शिंपी यांच्या शेतात एकनाथ उत्तम महाजन हे आपल्या स्वतःच्या  बैलजोडीने काम करीत असतांना अचानक विज कोसळून त्यांच्या ३८ हजार रूपये किंमतीचा पांढऱ्या बैलावर विज कोसळल्याने तो जागीच ठार झाला.घटनास्थळी तलाठी व्ही.डी.पाटील आणि पोलिस पाटील नरेंद्र पाटील यांनी धाव घेत पंचनामा केला. मात्र शासकीय पंचनामा गृहीत धरण्यासाठी मयत बैलाचे शवविच्छेदन होणे गरजेचे असताना या अत्पादकालीन परिस्थितीत तालुक्यात एकही पशुवैद्यकिय अधिकारी वेळेवर उपलब्ध झालेले नाहीत. अडावद धानोरा येथील पशुवैद्यकिय दवाखान्याना टाळे लागलेली होती तर कुणी भ्रमणध्वनी उचलला नाही तर कुणी नाँटरिचेबल होते. संकटाच्या वेळी शासकीय यंत्रणानांना अर्लट चे आदेश असतांना अत्पादकालीन परिस्थितीतीत पशुवैद्यकीय अधिकारी शोधून सापडत नसल्याची परिस्थिती तालुक्यात असल्याने यांची दखल प्रशासनाने मुख्यतेकडून तहसीलदार आणि लोकप्रतिनिधींनी घेणे गरजेचे आहे. शेतकरी आधीच बेजार झालेले असतांना प्रशासनातील अधिकारी बेजबाबदार पणे वागत असतील तर बळीराजांने कोणाकडे दाद मागावी या गहन विषय आहे. मयत बैलाचे लवकर शवविच्छेदन न झाल्यास     मोठी गैरसोय होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here