लिलाधर तायडे, सुनिल माळी, अमोल कोल्हे, राजू मोरेंना संधी

0
4

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी जळगाव महानगरची कार्यकारिणी मान्यतेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविली होती. त्याला प्रदेश कार्यालयाकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे. त्यात आठ उपाध्यक्ष, चार सरचिटणीस, आठ चिटणीसांचा समावेश आहे.

जिल्हा मजूर सहकारी फेडरेशनचे सभापती लिलाधर तायडे यांची विधानसभा क्षेत्र प्रमुख निवड करण्यात आली आहे तर राहुल टोके कार्यालय मंत्री व राजू बाविस्कर सह कार्यालयमंत्री असतील.

कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून अमोल कोल्हे, किरण राजपूत, अनिल पवार, आबा चौधरी, अकिल पटेल, भगवान सोनवणे, ॲड. रेखा कोचुरे, दुर्गेश पाटील यांचा समावेश आहे तर संघटन प्रमुख राजू मोरे, सरचिटणीसपदी सुनिल माळी यांच्यासह रहिम तडवी, दिलीप माहेश्‍वरी, विशाल देशमुख तसेच चिटणीसपदी किशोर सूर्यवंशी, अमोल सोनार, यशवंत पाटील, महेश भोळे, आकाश विश्‍वे, अक्षय सोनवणे, सुष्मिता भालेराव, अनिरुद्ध जाधव यांना संधी देण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्य असे : रोहिदास पाटील, अजय सोनवणे, सुनील पाटील, आर.डी. पाटील, सुहास चौधरी, खुशाल चव्हाण, सुजित शिंदे, दिनेश घुगे, संजय येवले, डी. डी. पाटील, राजेंद्र तायडे, अशोक सोनवणे, पुरुषोत्तम झोपे, मनोहर पाटील, प्रसाद वानखेड़े, डॉ. संग्राम सूर्यवंशी, अजिंक्य पाटील, तन्मय चौधरी, आदेश देशमुख, राकेश पाटील, मुकीमखान मिस्तरी, आशिक खान इमामखान, मीनाक्षी पाटील, सुवर्णा सोनवणे, रईसाबी जब्बार पटेल, छाया केळकर, पिंटू सोनार, गजानन देशमुख, अरुण गोसावी, जितेंद्र बागरे, युवराज पाटील, संजय हरणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here