जळगाव : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्ड सिटीतर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांमध्ये आजवर 403 रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या आहेत. सदस्यांनी एकूण 500 पिशव्या संकलित करण्याचा संकल्प केला आहे.
शिवाजीनगरातील एस. के. ऑइल मिल येथे रोटरी गोल्ड सिटीतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, एस. के. ऑइल मिलचे संचालक विनोद अग्रवाल, गोल्ड सिटीचे अध्यक्ष उमंग मेहता, मानद सचिव डॉ. नीरज अग्रवाल, मेडिकल कमेटी चेअरमन डॉ. सूर्यकिरण वाघण्णा, प्रकल्प प्रमुख धीरज अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी रक्तदानाचे महत्त्व व फायदे सांगून रोटरी गोल्ड सिटीने वर्षभर राबवलेल्या रक्त संकलन अभियानाचे कौतुक केले. शिबिरात 42 व्यक्तींनी रक्तदान करुन सहभाग घेतला. गोल्डसिटीचे माजी अध्यक्ष अशोक जैन, मेहुल त्रिवेदी, राहुल कोठारी, निखील चौधरी, प्रकाश पटेल यांची उपस्थित होते. दरम्यान, उन्हाळ्यामुळे रक्ताची टंचाई जाणवत असून, नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.