रोटरीतर्फे अंधत्व निवारण अभियान; जनजागृतीसाठी दवाखान्यात पोस्टर

0
2

जळगाव ः प्रतिनिधी
रोटरी क्लब जळगावने अंधत्व निवारण अभियान सुरू केले आहेे. या अभियानांतर्गत प्री-मॅच्युअर बेबी म्हणजेच सातव्या महिन्यात जन्माला येणारी मुले यांना येऊ शकणारे अंधत्व व त्याच्याबद्दलची जनजागृती करणारे पोस्टर हे प्रत्येक दवाखान्यात लावण्यात येत आहे.

सातव्या महिन्यात जन्माला येणाऱ्या मुलांचे डोळे हे पूर्णपणे विकसित नसतात. नंतरच्या विकासात बऱ्याचदा या मुलांना अंधत्व येते जे पालकांना फार उशिरा कळते. त्यावेळेस वेळ गेलेली असते म्हणून त्या संदर्भातली तपासणी ही मुलाच्या जन्माच्या वेळेसच स्पेशालिस्टकडून करून घेणे आवश्‍यक आहे.

रोटरीचे अध्यक्ष संदीप शर्मा व माजी अध्यक्ष डॉ. तुषार फिरके, डॉ. हेमंत बाविस्कर यांनी या अभियानाचे पोस्टर तयार केले. अभियानाची सुरुवात डॉ. विलास व डॉ. अनिता भोळे यांचे हॉस्पिटल, डॉ. राजेश व डॉ. सीमा पाटील यांचे हॉस्पिटल, डॉ. संग्रामसिंह पाटील यांचे हॉस्पिटल व निरामय हॉस्पिटल येथे हे पोस्टर लावून करण्यात आली. मानद सचिव मनोज जोशी, माजी अध्यक्ष जितेंद्र ढाके उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here