रेडिमेड दुकानदारासह इतरांचे दुकाने सिल न करता दंड केला वसूल

0
2

यावल : तालुका प्रतिनिधी
यावल शहरात पोलीस, नगरपालिकेचा धाक आणि प्रभाव संपला.दंडात्मक कारवाई नियम मोडणार्‍यांना लाभदायक,यावल शहरात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव होऊ शकतो,जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी,डीवायएसपी यांचे दुर्लक्ष असे वस्तुस्थितीजन्य वृत्त फक्त आणि फक्त दैनिक साईमत मध्ये दि.१७मे रोजी प्रसिद्ध होता बरोबर यावल पोलीस आणि यावल नगरपालिका यांनी संयुक्तिकरित्या कारवाई केली. परंतु त्या कारवाईत मोठ्या आर्थिक संपन्न दुकानदारांची दुकाने सील न करता फक्त दंडात्मक कारवाई करून एक किरकोळ सर्वसामान्य दुकानदार दंड भरू न शकल्याने त्याचे दुकान सील करण्यात आले त्यामुळे आजच्या कारवाईत भेदभाव आणि पक्षपातीपणा स्पष्टपणे उघड दिसून आला.
जळगाव जिल्ह्यासह यावल तालुक्यात कोरोना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी यांनी आज पासुन अत्यंत कडक निर्बंध लावण्याचे निर्देश दिले असुन,शहरात पोलीस अधिकारी व नगरपरिषद यांनी आज सकाळ पासुनच संचारबंदीचे नियम मोडणार्‍यांवर कारवाईचा धडाकाच सुरू केला आहे.यावल शहरातील बुर्‍हाणपुर-अकलेश्वर राज्य मार्गाला जोडणार्‍या प्रमुख मार्गावरील बुरुज चौकात आज सकाळी अकरा वाजेनंतर कोवीड१९च्या निर्बंध घातलेल्या नियमांचे पालन न करता अनावश्यक विनाकारण फिरणार्‍या ९८दुचाकी आणी चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करीत१९हजार३००रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात आला,तर शहरातील प्रमुख मार्गावरील अनुपम रेडीमेड स्टोअर्सवर१२हजार रुपये,पाकीजा स्टोअसर्८हजार रुपये,रूपकला साडी सेन्टर१०हजार रुपये आणी मंगलमुर्तीवर५हजार रूपयांची दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. एकुण५४हजार३००रुपये असे एकुण ७४हजार रुपये दंडात्मक कारवाईतुन वसुल करण्यात आले आहे.तर नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलनातील अनस मोबाईल शॉप दुकानदाराने दंड न भरल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फैजपुर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार, पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले,सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे,पोलीस अमलदार सलीम शेख,निलेश वाघ,भुषण चव्हाण, असलम खान,सुशिल घुगे,ज्ञानेश्वर कोळी,गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांच्यासह यावल नगरपरिषदचे कार्यालयीन प्रशासकीय अधिकारी विजय बडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदचे स्वच्छता निरिक्षक शिवानंद कानडे, मोमीनशेख, रवी काटकर, संदीप पारधे, नितिन पारधे, रामदास घारू यांनी या संयुक्त कार्यवाहीत सहभाग घेतला, दरम्यान प्रशासनाने रस्त्यावर उतरून केलेल्या या धडक कारवाईमुळे लॉक डाऊनचे नियम धाब्यावर ठेवुन अनाश्यक फिरणार्‍या रिकामटेकड्यांवर, अनधिकृतपणे दुकान सुरू करणार्‍यांवर आणी शासनाच्या नियमाकडे दुर्लक्ष करीत बाहेरून शटर बंद करून आतुन व्यवसाय करणार्‍या व्यवसायीकांवर आज चांगलाच वचक बसला. या कारवाईत दररोज सातत्य ठेवून कायद्याचे उल्लंघन पुन्हा पुन्हा करणार्‍यांवर कोणत्याही दबावाला बळी न पडता किंवा ओळख परिचय बाजूला ठेवून गुन्हे दाखल करून दुकाने सिल्क करायला पाहिजे त्याशिवाय यावल शहरातील गर्दी कमी होणार नाही असे नागरिकांमध्ये आणि कायदा पालन करणार्‍या व्यवसायिकांना मध्ये बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here