जळगाव ः प्रतिनिधी
महापालिकेत सत्तांतरानंतर शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची महापौर निवड झाली आहे. या निवडीनंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी घरी जावून महापौरांचा सत्कार केला तर उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा त्यांच्या दालनात जावून सत्कार केला.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांनी महापौर जयश्री महाजन यांचा सत्कार केला. या वेळी अशोक पाटील, अशोक लाडवंजारी, शकिला तडवी, संदीप पाटील, दिलीप माहेश्वरी, सलीम इनामदार, सुनील माळी, अरविंद मानकरी आदी उपस्थित होते.