जळगाव ः प्रतिनिधी
अमरावती येथे 11 ते 13 मे दरम्यान होणाऱ्या जी. व्ही. मालवणकर रायफल शूटिंग स्पर्धेत जळगावच्या एनसीसी 18 महाराष्ट्र बटालियनच्या सहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यात नूतन मराठा महाविद्यालयातील चेतन बडगुजर, रामेश्वर पाटील व काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचे शिवम पाटील, वेदांत पवार, मूजे महाविद्यालयातील नेहा परमार व प्रियंका सोनवणे यांचा समावेश आहे.
सुभेदार जय पॉल, हवलदार राजूराम यांनी सराव करून घेतला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कर्नल प्रवीण धिमन, प्राचार्य एल. पी. देशमुख यांनी त्यांचे कौतुक केले. लेफ्टनंट शिवराज मानके, सीटीओ हेमांगी वानखेडे, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचे प्राचार्य गणेश पाटील, सिद्धार्थ शिंदे यांनी मार्गदर्शन केले.