जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनतर्फे पुण्यात राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आली. यात शहरातील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कार्तिकी पाटील हिने 48 ते 50 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकवत कांस्यपदक मिळवले.
याबद्दल विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेतर्फे कार्तिकी पाटीलचा पालक विकास पाटील यांच्या समवेत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल, अध्यक्षा मंगला दुनाखे, सचिव सचिन दुनाखे, मुख्याध्यापिका श्रद्धा दुनाखे, विजया चौरे, सुषमा थोरात, मुख्याध्यापिका मनीषा पाटील, संगीता गोहील यांसह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.