फैजपूर ता यावल : प्रतिनिधी
देवाधिदेव महादेव यांची महिमा अफाट आहे. शंकर भगवान सर्व देवतांमध्ये सर्वात जास्त महत्त्व असून महादेव म्हणजे महान देव म्हणून ओळखले जातात.त्यांचे केस मनाचे प्रतीक, त्रिशूल मनावर नियंत्रण करतो.ध्यान शांततेचे प्रतिक आणि गळ्यातील सर्प अहंकाराचे प्रतिक असून जगातील दुष्टांचा नाश करणारा देवता म्हणून शंकर भगवान यांची ओळख आहे. महाशिवरात्रीचे औचित्य साधून फैजपूर येथील रहिवासी व श्री एस. बी. चौधरी हायस्कूल, चांगदेव येथील कलाशिक्षक राजू साळी यांनी आपल्या कल्पकतेने अतिवास्तव वादी शैलीत कुंचल्याद्वारे महादेवाची पैंटींग तयार करण्यात आली असून सदर पैंटींग मध्ये पिंडेवर महादेवाचे मुख दाखवण्यात आलेले आहे.
पैंटींग साठी निळ्या रंगाचा वापर करून सुंदर कलाकृती तयार करण्यात आलेली आहे. महाशिवरात्रीच्या पर्वावर पैंटींग जणू सर्वांसाठी पर्वणी ठरत असून राजू साळी यांचे सर्वदूर कौतुक होत असून त्यांनी आतापर्यंत नैसर्गिक, सामाजिक, धार्मिक, रचनात्मक चित्रे तयार केलेली आहेत.