जळगाव ः प्रतिनिधी
राजस्थानी ब्राम्हण संघातर्फे शुक्रवारी सरदार पटेल लेवा भवनात 25 बटूंच्या सामूहीक उपनयन संस्काराचा कार्यक्रम झाला. बहुभाषिक ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष सत्यनारायण खटोड, शिवप्रसाद रामावत मुख्य यजमान होते.
कार्यक्रमाचे पौरोहित्य पंडीत गोपाल तिवारी यांनी केले. त्यांना मनसुख तिवारी यांनी सहकार्य केले. 300 समाजबांधवांनी उपस्थित राहून बटूंना आशिर्वाद दिले. बहुभाषिक ब्राम्हण संघाचे अजितदादा नांदेडकर, श्रीकांत खटोड, लेखराज उपाध्याय, सुरेंद्रनाथ मिश्रा, अशोक वाघ, राजेश नाईक, मोहन तिवारी उपस्थित होते. राजेंद्र जोशी यांनी रेखाटलेल्या रांगोळीचे विशेष वैशिष्ट्य ठरले. संजय व्यास, शिवप्रसाद शर्मा, महेंद्र पुरोहित, किशन अबोटी, दीपक जोशी, महावीर पचारिया, चंदन जोशी, रवी पांडे, दिलीप सिखवाल, प्रकाश जोशी यांनी नियोजन केले.