मुंबई: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर युद्धाची घोषणा केली आहे. त्यामुळे युक्रेन आणि रशियाच्या युद्धाला सुरूवात झाली आहे. दरम्यान तिकडे युद्धाची घोषणा होताच भारतीय शेअर बाजार कोसळले आहे. पहिल्या मिनीटांत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेंसेक्स 1400 अंकांनी घसरला असून, तो 55,904 वर पोहोचला आहे. बँकिंग शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. गुंतवणुकदारांचे काही मिनीटात सुमारे 6 लाख कोटींचा तोटा झाला आहे. सेंसेक्सचे सर्व 30 शेअर घसरले आहेत. तर तिकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे निफ्टी हे देखील 370 अंकांनी घसरुण 16,695 येऊन थांबले आहे. रशियाने युक्रेन युद्धाची घोषणा केली असून, त्यानंतर कच्चा तेलाची किंमती वाढल्या आहेत. कच्चा तेल हा प्रति बॅलर आता 99.75 डॉलर इतके झाले आहे. मागील आठ वर्षांत पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तज्ञांनूसार येणाऱ्या काही दिवसांत आणखी कच्चा तेलाच्या किंमती वाढून 120 डॉलरपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 20 रुपयांनी वाढ होऊ शकते.