जळगाव : प्रतिनिधी
युवासेना जळगाव महानगरतर्फे विधवा महिलांना शुक्रवारी इलेक्ट्रिक मोटर युक्त शिलाई मशीनचे वाटप नेहरू चौक येथील शिवसेना कार्यालयात करण्यात आले. शिवसेना संपर्कप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सदर उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
जयश्री नरेंद्र देशमुख, रुपाली अजय पाटील, ज्योती गणेश महाजन, सुशीला फकिरा नाईक, स्वाती गोविंदा देवरे या विधवा महिलांना शिलाई मशीन देण्यात आल्या.
या व्ोळी महापौर जयश्री महाजन, माजी महापौर नितीन लद्धा, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, युवासेना प्रदेश सहसचिव विराज कावडीया, विरोधी पक्षनेता सुनील महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, गटनेता अनंत जोशी, नगरसेवक गणेश सोनवणे, नितीन बर्डे, महिला महानगरप्रमुख शोभा चौधरी, ज्योती शिवदे, युवासेना जिल्हायुवाधिकारी शिवराज पाटील, महानगर युवाधिकारी विशाल वाणी, सरिता माळी, गणेश गायकवाड, मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरळकर, अमित जगताप, गिरीश सपकाळे, चेतन कापसे, उमाकांत जाधव, शंतनू नारखेडे, प्रीतम शिंदे, भूषण सोनवणे, संकेत कापसे, अमोल मोरे, अभिजीत रंधे, राजेश वारके, आदी उपस्थतीत होते.
या विधवा महिलांना रोजगार उपलब्ध होऊन संसार चालवण्यासाठी मदद व्हावी या हेतूने सदर वाटप करण्यात आली.