यावल शहरात पोलिस, नगरपालिकेचा धाक, प्रभाव संपला

0
4

यावल : तालुका प्रतिनिधी
कोरोनाचा सत्सर्ंग रोखण्यासाठी तसेच वाढू नये म्हणून जिल्हास्तरावरून प्रशासन रात्रंदिवस परिश्रम घेत आहे,जिवनावश्यक, अत्यावश्यक गरजा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले असतांना मात्र यावल शहरात मुख्य रस्त्यावर आणि ठिक-ठिकाणी गल्लीबोळात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने पायदळ चालणे सुद्धा मुश्किल झाले आहे अनेक दुकानदार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पद्धतशीरपणे पायमल्ली करीत असून यावल नगरपालिका आणि यावल पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दंडात्मक कारवाई करताना दुकानदाराचे व्यवसायाचे स्वरूप, रूप, हितसंबंध वशिलेबाजी लक्षात घेऊन नाम मात्र कारवाई केले जात असल्याने नागरिकांमध्ये मात्र तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे याकडे जिल्हाधिकारी , प्रांताधिकारी फैजपूर, डीवायएसपी फैजपूर यांनी लक्ष केंद्रीत करून महसूल,यावल नगरपालिका,व यावल पोलिसाकडून कडक कारवाई करून किरकोळ स्वरूपाची दंडात्मक कारवाई न करता व्यापारी व नागरिकांना अद्दल घडेल या स्वरूपाची कारवाई करावी जेणेकरून यावल शहरातील गर्दी कमी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही असे परिसरात बोलले जात आहे.
४ मे २०२१ रोजी रावेर तालुक्यात रावेर येथे प्रतिबंधित दुकानाचे अर्धे तर कुठे पूर्ण शटर उघडे करून खुलेआम व्यवसाय सुरू असल्याने रावेर मध्ये अनेक व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करून दुकाने सील करण्यात आली होती. फैजपुर शहरात सुद्धा २ कापड दुकाने सील केले होते. रावेर येथे एका दुकानात १२१ ग्राहक आढळून आले त्यासंदर्भात १ लाख ४३ हजार रुपयांचा दंड वसूल करुन मॉल सील करण्यात आले होते. परंतु यावल शहरात एकाच ठिकाणी २५ ते ३० ग्राहक आढळून आल्यावर सुद्धा फक्त ५ हजार रुपयांचा दंड वसूल केल्याने यावल पोलिसाच्या कारवाईबाबत दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे. प्रांताधिकारी फैजपूर आणि डीवायएसपी फैजपूर यांच्या कार्यक्षेत्रातील रावेर आणि यावल तालुक्यात कारवाई करताना कायदेशीर भेदभाव आणि पक्षपातीपणा कशाकरीता करण्यात येत आहे तसेच मोठमोठ्या दुकानदारांना व्यवसायिकांना सोडून किरकोळ व्यवसाय करणार्‍यांविरुद्ध कारवाई का?यावल नगरपरिषदेचे कर्मचारी कुठे ही कारवाई करताना दिसून येत नसल्याने यावल नगरपरिषदेने दंडात्मक वसुलीचे अधिकार यावल पोलिसांना दिलेले आहेत का? इत्यादी प्रकरणाची चौकशी डीवायएसपी फैजपूर, प्रांताधिकारी फैजपूर यांनी करायला पाहिजे तसेच यावल शहरात गेल्या महिन्याच्या कालावधीत मुख्य रस्त्यावर आणि गल्लीबोळात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्स पाळले जात नसल्याने तसेच ५० टक्के नागरिक तोंडावर मुखपट्टी लावत नसल्याने शासकीय यंत्रणा मात्र आंधळ्याची भूमिका घेत असल्याने एकही परिणामकारक कारवाई न झाल्यामुळे तसेच किरकोळ स्वरूपाची दंडात्मक कारवाई करून दुकाने सील न करता हितसंबंध जोपासले जात असल्यामुळे यावल शहरात पोलीस नगरपालिकेचा आणि महसूलचा धाक प्रभाव राहिला नसल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे, तरी जिल्हाधिकारी जळगाव, प्रांताधिकारी फैजपूर, डीवायएसपी फैजपूर यांनी यावल शहरात सकाळी आणि सायंकाळी अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता यावल शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी ,सोशल डिस्टंसिंग फज्जा आणि तोंडावर मुखपट्टी न लावलेले, आणि आम्हाला कोरोना होत नाही असे म्हणून घेणारे अनेक नागरिक प्रत्यक्ष दिसून येतील आणि शासकीय यंत्रणेची कारवाई कशा पद्धतीने सुरू आहे हे लक्षात येईल,याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांनी तातडीने दखल न घेतल्यास यावल शहरात सुद्धा कोरोना आपले रौद्ररूप धारण करणार असे सुद्धा यावल परिसरात बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here