यावल शहरात अवैध वाळू वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर पकडले

0
3

यावल : प्रतिनिधी
यावल तालुक्यातील भालशिव,पिप्री घाट कडून अवैधरीत्या गौंणखनिज(वाळू) वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर यावल नगरपरिषद शेजारी सापळा रचून पकडून पोलिस स्टेशन यावल येथे दंडात्मक कार्यवाही करीता जमा करण्यात आले आहे. या कारवाईने अवैध वाळू वाहतूकदारात मोठी खळबळ उडाली आहे.
जप्त केलेली ट्रॅक्टर क्र.-४३–१११०२) ट्रॅक्टर क्र.-१९-१७१९ असे दोन्ही ट्रॅक्टर यावल येथील आहेत. अवैध गौण खनिज वाहतूक करणार्‍या वाहनांना पकडण्यासाठी पथकात सहभागी पथक प्रमुख-मंडळ अधिकारी यावल भाग यावल शेखर तडवी, पथक सहाय्यक -तलाठी यावल ईश्‍वर कोळी, विरावली तलाठी मोरोडे, यावल येथील कोतवाल निलेश गायकवाड सहभागी होते.
यावल तालुक्यात असलेल्या एकूण५मंडळात अंदाजे एकूण ६०ते७०अवैध वाळू वाहतूकदार ट्रॅक्टर आणि डंपर(डंपर अंदाजे ५ ते १०)आहेत.गेल्या महिन्याच्या कालावधीत प्रांताधिकारी कैलास कडलक,तहसीलदार महेश पवार,नायब तहसीलदार आर.डी. पाटील,आर.के.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यावल महसूल विभागातील सर्कल तलाठी यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूकदारांवर बेधडक कारवाई सुरु केली आहे. अजूनही काही २ डंपर वाले भर दुपारच्या वेळेस बर्‍हाणपूर- अंकलेश्‍वर महामार्गावरून म्हणजे किनगाव पासून रावेर पर्यंत सुसाट वेगात अवैध वाळू वाहतूक करीत आहेत त्यांना कोणी पकडू शकत नाही असे ते म्हणत असले तरी इतर अवैध वाळू वाहतूकदारांनी मध्ये अवैध वाळू वाहतुकीची मोठी चुरस निर्माण झाली असून अवैध वाळू वाहतुकीत राजकीय पक्षांची घनिष्ठ संबंध असलेले काही ठराविक अवैध वाळू वाहतूकदार आहेत.अवैध वाळू वाहतुकीत राजकीय प्रभावामुळे अनेकांवर कारवाई होत नसल्याने इतर अवैध वाळू वाहतूक धारांमध्ये नाराजी व संताप व्यक्त करण्यात येत असून कोणते ट्रॅक्टर कोणते डंपर कोणाचे आहे आणि ते कुठून कुठे अवैध वाळू वाहतूक करतात याबाबत खुद्द अवैध वाळू वाहतूकदारा मध्येच सतत चर्चा सुरू असते अवैध वाळू वाहतूकदारांनी आता नवीन पॅटर्न सुरु केला/वाळू वाहतुकीच्या वेळेत बदल केला आहे,काही अवैध वाळू वाहतूक दार हे स्वतः मोबाईल वरून तहसीलदार सर्कल तलाठी किंवा महसूल पथकाचे लोकेशन घेऊन अवैध वाळू वाहतूक करीत असतात याची दखल महसूल विभागाने घेऊन अवैध वाळू वाहतूक संदर्भात यावल तालुक्यात ग्रामीण भागात व शहरी विभागात नागरिकांना आव्हान करून बक्षीस योजना जाहीर करून(प्रत्येक ट्रॅक्टर डंपर मागे ५०० ते१हजार रुपये माहिती देणार्‍यास बक्षीस देऊन) लाखो रुपयांची रॉयल्टी वसूल करून शासकीय खजिन्यात जमा करावे असे सुद्धा आता यावल तालुक्यात बोलले जात आहे.
गेल्या महिन्यात यावल तहसील मधील गौण खनिज कर्मचार्‍याने फक्त एका प्रतिनिधीस अवैध गौण खनिज दंडात्मक कारवाईची माहिती देऊन चमकोगिरी केली, वर्षभरातील दंडात्मक कारवाई संशयास्पद वाटते कारण तालुक्यात एकूण ६० ते ७० अवैध वाळू वाहतूक ट्रॅक्टर आणि डंपर आहेत रोजचे पन्नास ट्रॅक्टर जरी धरले तरी वर्षाला किमान पन्नास ते साठ हजार ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक फेर्‍या मारतात वर्षभरातील महसूल ची कारवाई प्रत्यक्ष बघितली असता कारवाईबाबत आणि मोठ्या हप्ते खोरी बाबत दाट संशय निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here