यावल येथे तरूणावर तिक्ष्ण हत्याराने वार

0
15

यावल :प्रतिनिधी 
शहरातील २१ वर्षीय तरूणावर तिक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना रात्री घडली आहे. हा हल्ला प्रेमप्रकरणातून झाला असल्याचा आरोप जखमी तरूणाच्या कुटुंबियांनी केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल शहरातील काजीपुरा भागात राहणारा जावेद युनूस पटेल (वय-२१) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करतो. गेल्या काही दिवसांपासून त्याचे व एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे समजते.

दरम्यान, फैजपूर येथील अनोळखी तीन जण गुरूवार ५ मे रोजी रात्री १० वाजता जावेद याला भेटण्यासाठी आले होते. जावेद यास गोड- गोड बोलून दुचाकीवर बसवून भुसावळ रोडवरील पीर बाबा दर्गाजवळ घेऊन गेले. तेथे जाऊन त्या तिघांनी जावेद याच्याशी वाद घालण्यास सूरूवात केली शाब्दीक वाद हमरी-तुमरीवर आली. यात त्या तीघांनी जावेदवर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. यात जावेद गंभीर जखमी झाला. यानंतर तीनही संशयित आरोपी  घटनास्थळाहून फरार झाले. मध्यरात्री २ वाजता काही आदीवासींना जावेद जखमीवस्थेत पडलेला दिसून आला. त्यांनी त्याला तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. जावेदची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला ताडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, प्रेमप्रकरणातून हा जीवघेणा हल्ला झाला असल्याचा आरोपी जखमी जावेदच्या नातेवाईकांनी केला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक अशित कांबळे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा याबाबत यावल पोलीसात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here