यावल, प्रतिनिधी । यावल येथील नगरपरिषदचे नगरसेवक तथा आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष व आई हॉस्पीटलचे संचालक डाॅ.कुंदन फेगडे यांच्या परिवारातर्फे जागतिक पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार व गौरव करण्यात आला.
यावल येथे मंगळवार दि.16 नोव्हेंबर2021रोजी येथील नगर परिषदचे युवा नगरसेवक तथा सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांच्या आई हॉस्पीटल हॉल मध्ये जागतीक पत्रकार दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील विविध वर्तमानपत्राचे अनेक वर्षापासुन वृत्त लेखानाचे कार्य करणाऱ्या वृत्तपत्र प्रतिनिधींचा सत्कार व सन्मान करण्यात आला.याप्रसंगी डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते जेष्ठ पत्रकार डी.बी.पाटील,पत्रकार राजु कवडीवाले,पत्रकार अय्युब पटेल,पत्रकार शेखर पटेल,अरूण पाटील,सुनिल गावडे,ज्ञानदेव मराठे,पराग सराफ,तेजस यावलकर,शब्बीर खान,विक्की वानखेडे,दिपक नेवे,प्रकाश चौधरी आदी पत्रकारांचा सत्कार करण्यात आले.यावेळी डॉ.कुंदन फेगडे यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातुन ग्रामीण क्षेत्रात वृत्त संकलन आणि लेखनाचे कार्य करीत असलेल्या पत्रकारांविषयी आपले मनोगत व्यक्त करीत पत्रकारांच्या कार्याचा गौरव केला.या गौरव सोहळा कार्यक्रमात भाजपाचे कार्यकर्ते परेश नाईक,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार डॉ.फेगडे यांचे संपर्क प्रमुख सागर लोहार यांनी मानले.