मोठी दुर्घटना : भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश, दोन्ही पायलट बेपत्ता

0
78

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये भारती लष्कराचे चिता  हेलिकॉप्टर कोसळल आहे. या हेलिकॉप्टरमधील पायलट आणि को-पायलट मात्र बेपत्ता आहेत. गुरेज भागात गुजरा नाला भागात हे हेलिकॉप्टर गस्तीवर होते. हिमाच्छादीत भागात हे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टर अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ते कोसळले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळताच बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. पायलय आणि को-पायलटचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पायलट आणि को-पायलट सुरक्षित बाहेर पडल्याचं बोललं जात आहे. पण अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here