मुंबईचे मुख्य अभियंता रणजित हांडे यांचा होणार ‘सचिन वाझे’?

0
3

मुंबई : यास्मीन शेख  
राज्यातील  सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दरवर्षी हजारो कोटीची कामे केली जातात.सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण हे या खात्याचे  मंत्री असले तररी त्यांना या खात्यातील निधी नेमका कामांवर खर्च होतो की,प्रमुख   अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा होतो याची कल्पना आहे की नाही,याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.विशेषतः मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता  रणजित हांडे यांचे नाव चर्चेत  आघाडीवर आहे.  सार्वजनिक बांधकाम  विभागाला जो काही  एकूण कोट्यवधीचा निधी दिला जातो,त्यातून 2 टक्के निधी आपल्याकडे जमा करण्याचे तोंडी आदेश त्यांनी राज्यातील  सर्व अधिक्षक अभियंत्यांना  दिले  असल्याची जोरदार चर्चा सार्वजनिक बांधकाम विभागात सुरु असल्याचे समजते. याबाबत संबंधित मंत्र्यांनी व मंत्रालयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी  चौकशी केल्यास मुख्य अभियंता  रणजित  हांडे यांचा अनिल देशमुख प्रकरणातील सचिन वाझे झाल्याशिवाय राहणार नाही,अशी जोरदार चर्चा राज्यासह मंत्रालयात रंगली आहे.
राज्यात चांगले रस्ते हवे हे प्रत्येक व्यक्तीला वाटत असले तरी या रस्त्यांचा दर्जा टक्केवारीमुळे  खालावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.राज्यात जवळपास 8 वर्षांपासून प्रलंबित कामे सध्या सुरू आहेत.ज्याला किमान 66 हजार कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला हवा आहे मात्र मागील वर्षी अर्थसंकल्पात फक्त 15 हजार कोटीची तरतूद करण्यात आली. त्यातही वेगवेगळ्या हेड खालील कामांचा समावेश आहे.
वास्तव्यात मागील वर्षी कोरोना संकटामुळे  सरकारने जवळपास या ठेकेदारांची 100  टक्के बिलं थकवली आहेत  मात्र बिल थांबले म्हणून अधिकाऱ्यांची जी हुजुरी थांबली नाही . दसरा- दिवाळी तर आहेच मात्र आता महागड्या देश-विदेश दौऱ्यांची मागणी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्याची धक्कादायक माहिती ‘साईमत’ कडे मिळाली  आहे. सार्वजनिक विभागाच्या रेस्टहाऊसवर पार्टीचा धुमाकूळ  काही प्रमाणात थांबला असला तरी कामे  सुरू झाली की, अधिकारी पाहणी दौरा करतात या वेळी  ठेकेदारांनी  त्या अधिकाऱ्यांची डिझेलपासून तर त्या भागातील त्यांच्या अधिकारी मित्रांसोबत खानपानची वेवस्था पहावी लागत आहे. या  सर्व जी हुजिरीसाठी ठेकेदारांना आपल्या घरातून पैसे द्यावे लागत आहेत. त्यात काही लहान ठेकेदार कर्जबाजरी होऊन आत्महत्येच्या उंबरठ्यावर आले असल्याचे विदारक सत्य नाकारून चालणार नाही.
आणि याला जवाबदार आहेत सार्वजनिक बांधकाम विभागातील वर्षानुवर्ष आवडीच्या ठिकाणी बसणारे अधिकारी. त्यांना शिस्त लागावी म्हणून 26 वर्षानंतर पदोन्नती करून बदल्या केल्याचा दावा सार्वजनिक विभागाने केला असला तरी ज्या ठिकाणी सर्वात जास्त निधी दिला जात आहे किंवा विभागाची जास्त कामे सुरू आहेत अशा ठिकाणी बसणाऱ्या अधिकाऱ्यांचे काय? याचे उत्तर विभागाकडे नाही. एखाद्याचे नशीब चांगले असते हे मान्य आहे मात्र एखाद्या अधिकाऱ्यांचे संपूर्ण नशीब चांगलेच आहे हे मान्य होणे थोडे अवघड आहे. अशाच प्रकारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुंबई विभागाचे मुख्य अभियंता हांडे यांचे नशीब जोरात आहे.त्यांना  नियुक्ती पासून आजपावेतो जेथे ही पोस्टिंग मिळाली ती  क्रीम पोस्टिंग  आहे. त्यांच्यासारखे नशीब अन्य अभियंत्यांचे नाही हा देवाचाच दोष म्हणावा  लागेल.
टक्केवारीच्या या अलिखित आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यादीत श्री, हांडे यांचे नाव सर्वात पुढे असल्याचे बोलले जात आहे . नाशिक, पुणे, औरंगाबाद आणि आता मुंबई या भागातून सर्वच राजकीय नेत्यांबरोबर जवळचे संबंध असल्याने  त्यांना कोणाचे भय नाही, अशी चर्चा अधिकारी करत आहे .
सार्वजनिक बांधकाम विभागाला अर्थ विभागाने फक्त 9 टक्के रक्कम दिली आहे.त्यामुळे सर्वांचे समाधान करणे विभागाला शक्य नाही हे खरे असले तरी हांडेसारख्या अधिकाऱ्यांनी टक्केवारीसाठी ठेकेदार व कनिष्ठ अधिकाऱ्यांना वेठीस पकडले असल्याचे बोलले जात आहे.आता या अधिकाऱ्याच्या चौकडीत बसणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती ही वरिष्ठांनी घेऊन कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त  करण्यात येत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here