मिझोरामची वाहतुक यंत्रणा म्हणजे वाहतूक शिस्तीचा आदर्श  

0
31

मुंबई : प्रतिनिधी यास्मीन शेख 

वाढत्या लोकसंखेमुळे आता वाहनधारकांची देखिल संख्या अधिक झाली आहे यामुळे वाहतूक कोंडीत अनेक वाहनचालक जोरजोरात हॉर्न वाजवून वातावरण तापवतात तर काही मध्ये गर्दीत घुसून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. यामुळे वाहतूक मोकळी होण्याऐवजी गुंता आणखी वाढतो व सर्वांना मनस्ताप होतो, हा आपला सर्वांचा नेहमीच अनुभव. पण, आपल्याच देशात मिझोराम हे एक असे राज्य आहे की, जिथे नागिरक वाहतूक कोंडीतही, वाहतुकीची शिस्त मोडत नाहीत.
महिंद्रा उद्योग समुहाचे आनंद महिंद्रा यांनी ‘अतिशय सुंदर फोटो..’ म्हणून अशा वाहतूक शिस्तीचा फोटो रिट्विट केला आहे. फोटोत वाहतूक कोंडीमुळे वाहनांची लांब रंग लागली आहे. पण, सर्व वाहनचालक शिस्तीत लाईन लावून उभे आहेत. विरुद्ध दिशेचा वाहतुकीचा रस्ता पूर्ण रिकामा आहे पण कोणीही रिकाम्या रस्त्यात घुसून पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाही. रोड डिव्हायडर लाईन ओलांडत नाही!
संदीप अहलावत नावाच्या ट्विटर यूजरने ट्विट केलेला फोटो रिट्विट करताना आनंद महेंद्रा म्हणतात “अतिशय सुंदर फोटोएकही गाडी रोज मार्करच्या बाहेर नाही. हे प्रेरणादायक आहे. हा फोटो एक अतिशय चांगला संदेशही देतो. हे आपल्याला माहीत असते की आपल्याला आपल्या आयुष्याच्या गुणवत्तेत कशी सुधारणा करायची आहे. नियमांचे पालन करा. मिझोरामचे लोक खरंच कौतुकास पात्र आहेत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here