मार्च महिन्यात राज्याला मिळाणार गुडन्यूज – राजेश टोपे

0
4

कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी अगदीच कमी झालेली आहे, असं नाही. पण मार्च महिन्यात आता असलेले निर्बंध हटविण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. तशी गुडन्यूज लवकरच दिली जाईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी अगदीच कमी झालेली आहे, असं नाही. पण मार्च महिन्यात आता असलेले निर्बंध हटविण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. परिस्थिती बघून लागू असलेले छोटे-मोठे असे सर्वच निर्बंध 100 टक्के हटवण्यात येतील. निर्बंध हटवावे अशी मुख्यमंत्र्यांचीही इच्छा असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

मार्च महिन्यानंतर राज्यात 100 टक्के अनलॉक केला जाणार असल्याची माहिती राज्याच्या टास्क फोर्सने दिली आहे. सध्या राज्यात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कमी झालेली नाही असंही टास्क फोर्सने स्पष्ट केलंय. टाक्स फोर्सच्या भूमिकेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

कोरोनाच्या अनुषंगाने राज्य सरकारने राज्यात लागू केलेले निर्बंध सरकार आता कमी करू शकतं, असं पत्र केंद्रानेच राज्याला पाठवलं असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. राज्यात लसीकरण बऱ्यापैकी झालं असून याचा परिणाम निर्बंध शिथिल करण्यावर होत आहे. त्यामुळे मार्च महिन्यात आणखी निर्बंध शिथिल केले जातील आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा अशीच इच्छा आहे, असं आरोग्यमंत्री टोपेंनी सांगितलं.
आता राज्यात फार दिवस निर्बंध राहणार नसून सध्या काही प्रमाणात निर्बंध असलेले हॉटेल व्यवसाय, लग्न, थिएटर तसेच इतर निर्बंध 100 टक्के परिस्थिती बघून हटवण्यात येतील अशी माहितीही टोपे यांनी दिलीये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here