महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचा समारोप

0
2

जळगाव : प्रतिनिधी
शालेय शिक्षणातील विषय, अभ्यासाचा तणाव, स्वच्छता अशा अनेक विषयांवर बालकलावंतांनी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सुरू असलेल्या 18 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या दुसऱ्या व अखेरच्या दिवशी सादरीकरण करून प्रेक्षकांना अचंबित केले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ला.ना.सार्वजनिक विद्यालयाचे अमोल संगीता अरुण लिखित उल्हास ठाकरे दिग्दर्शित द बटरफ्लाइज, श्री फाउंडेशन वरणगाव यांचे गणेशसिंग मरोड लिखित अजय पाटील दिग्दर्शित शोध अस्तित्वाचा, सातपुडा शैक्षणिक व सामाजिक संस्था शहादा यांचे ऋषिकेश तुराई लिखित रोहिणी निकुंभ दिग्दर्शित म्याडम, श्री समर्थ मठ संस्थान, इंदूर यांचे उषा चोरघडे लिखित – दिग्दर्शित बंद पुस्तक, श्री संत ज्ञानेश्‍वर शिक्षण मंडळ भुसावळ यांचे विनोद उबाळे लिखित, सोनाली वासकर दिग्दर्शित नाते तुझे नि माझे, वर्धमान युनिव्हर्स ॲकॅडमी, जळगाव यांचे वैभव मावळे लिखित, आकाश बाविस्कर दिग्दर्शित आई मला छोटीशी बंदूक दे ना, विद्या फाउंडेशन जळगाव यांचे ॲड.शैलेश गोजमगुंडे लिखित, विशाल जाधव दिग्दर्शित सांबरी या बालनाट्यांचे सादरीकरण झाले. सातवे बालनाट्य सादर झाल्यानंतर रंगकर्मी, प्रेक्षक व स्पर्धेचे परीक्षक गोविंदा गोडबोले (सांगली), नविनी कुलकर्णी (मुंबई), सुषमा मोरे (नागपूर) यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा छोटेखानी समारोप करण्यात आला. वैशाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेचे समन्वयक दीपक पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here