जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन संघ व्यवस्थापक पदी जितेंद्र शिंदे यांची सलग तीसऱ्यांदा महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.
एडहॉक कमिटी महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन (भारतीय बास्केटबॉल महासंघ) यांच्या अधिपत्याखाली दि. १२ ते १६ डिसेंबर २०२१ रोजीपर्यंत औरंगाबाद येथे १८ वर्षा आतील मुले व मूली राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. सदर राज्यस्तरीय स्पर्धेतुन महाराष्ट्र बास्केटबॉल संघ निवडन्यात आला. निवड झालेला संघ दि. ४ ते १० जानेवारी दरम्यान इंदौर (मध्यप्रदेश) येथे भारतीय बास्केटबॉल महासंघ आयोजित १८ वर्षा आतिल मुले व मूली राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
१८ वर्षा आतिल मुले महाराष्ट्र संघासाठी जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन प्रभारी सचिव व सेंट टेरेसा हायस्कूल क्रीड़ा शिक्षक जितेंद्र शिंदे यांची संघ व्यवस्थापक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या ह्या निवडी बद्दल जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन अध्यक्ष अशोक जैन, सचिव गिरीश पाटील, संस्थापक जयंत देशमुख, सेंट टेरेसा हायस्कूल व्यवस्थापिका सिस्टर पवित्रा, मुख्याध्यापिका सिस्टर ज्युलिट, उपमुख्याध्यापिका सिस्टर लिटिल रोज यांनी अभीनंदन केले.
जितेंद्र शिंदे यांची सलग तीसऱ्यांदा महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. या अगोदर ते २०१८ मध्ये लुधियाना (पंजाब) येथे १८ वर्षा आतिल महाराष्ट्र मुले संघ व्यवस्थापक, २०१९ मध्ये पटना (बिहार) येथे १८ वर्षाआतिल मूली महाराष्ट्र संघ प्रशिक्षक, आणि आता २०२२ मध्ये इंदौर (मध्यप्रदेश) येथे होणाऱ्या १८ वर्षा आतिल महाराष्ट्र मुले संघ व्यवस्थापक म्हणून निवड करण्यात आली आहे.