मनपा आयुक्त गायकवाड यांची कार्यतत्परता उमाळे येेथील जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी  

0
2

जळगाव ः प्रतिनिधी
मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांनी शहरात होणाऱ्या अशुध्द व  गढूळ पाणीपुरवठ्याची तातडीने दखल घेत आज दुपारी उमाळा येथील जलशुध्दीकरण केंद्रास भेट देत पाहणी केली. उमाळा जलशुध्दीकरण केंद्रातील 1200 मी.मी. व्यासाचा व्हॉलचा गिअर नादुरुस्त झाल्याने शुध्द पाणीपुरवठ्यात व्यत्यय आला होता.याबाबत नागरिकांकडून तक्रारीही करण्यात आली होती. सदर नादुरुस्त गिअर तातडीने औरंगाबाद येथून आणून सकाळी बसविण्यात आला व पाणी पुरवठ्यातील व्यत्यय दूर करण्यात आला.

भेटी दरम्यान आयुक्त गायकवाड यांनी संपूर्ण पाणी शुध्दीकरण प्रक्रियेची माहिती घेतली  तसेच शुध्द पाणी स्वत: पिऊन खात्री करुन घेतली.याशिवाय अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणीदेखील जलशुध्दीकरण केंद्रात केली व या योजनेतील कामातील अडचणी समजून घेवून त्यांची लवकरच पूर्तता करण्याबाबत तयारीही दर्शविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here