मंदिर, मशिदसह इतर धार्मिक स्थळांवरील भोंग्याच्या स्पीकर परवाना वर मार्गदर्शन

0
1

फैजपूर ता यावल: प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशनुसार कारवाई करणे बाबत फैजपूर येथील सुमंगल लान्स येथे शांतता समिती बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत मंदिर, मशिदसह इतर धार्मिक स्थळांवरील भोंग्याच्या स्पीकर परवाना संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीत  फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांनी  सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशनुसार कारवाई करणे बाबत मार्गदर्शन  व कायदा सुव्यवस्था अंमल बजावणी,  मंदिर, मशिद सह इतर धार्मिक स्थळ धर्मगुरू विश्वस्त यांना आपल्या धार्मिक स्थळावरील लाऊस स्पीकर भोंगे आदी विषयी सविस्तर माहिती देऊन कायद्याचे प्रथम पालन करून आपली धार्मिक सद्भावना जपावी व शहरात शांतता कायम प्रस्तापित रहावी याचे आवाहन  केले आहे.

याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे,  महामंडलेश्वर  जनार्दन महाराज सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन लोखंडे, मुख्याधिकारी वैभव लोंढे, मौलाना अनस ,नितीन चौधरी, विलास महाजन,  पवन यादव, कन्हैया महाराज ,रहुप जनाब, शेख इक्बाल, अमीद काश्मी, करिफ उल जमा आदी उपस्थित होती.
डॉ कुणाल सोनवणे म्हणाले की, या बाबत शहरातील अथवा अन्य व्हाट्सअप फेसबुक ग्रुप वर आलेल्या कोणत्याही निराधार गोष्टींना बळी न पडता तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता त्याची शहानिशा केल्याशिवाय ते अन्यत्र फॉरवर्ड करू नये ते किंवा समाजात पसरवू नये.असे सांगीतले.

याप्रसंगी प्रत्येकाने  शासनाचे नियम, आत्मचिंतन व पालन केल्यास शहरात कायम सुव्यवस्था शांतता नांदुन सुख-समृद्धी विकासाचे कार्य सहज पणे साधता येईल. अपूर्ण ज्ञानाने धर्म आचरण करताना आपणास आजही पोलिसांचा आधार घ्यावा लागतो याची व शहरातील वाढत्या अतिक्रमण मुळे होणारा अडथळा या बाबी खंत व्यक्त करून या बाबी शहरात सर्व धार्मिक स्थळांचे चालक-मालक यांचे एक समिती कार्यरत व्हावी व त्याद्वारे सदर प्रश्न समस्या शांतता मार्गाने सोडाव्यात अशी रास्त अपेक्षा महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांनी प्रमुख मार्गदर्शक मनोगतात व्यक्त केली.
याप्रसंगी जीव घेण्या महाभयंकर कर्ण – ककर्षा डीजेच्या थैमानावर बंदी आणण्याची मागणी तसेच बुधवार हा बाजाराचा दिवस असल्यामुळे या दिवशी कोणत्याही मोर्च्या आंदोलनाला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी संजय सराफ यांनी मांडली त्यास सर्वांनी सहमती दर्शवित आपल्या भावना व्यक्त केल्या मौलाना अनस, शेख इक्बाल, रहुप जनाब, यांनीही आपल्या समयोचित भावना व्यक्त करून कायद्याचे पालन करून शहरात अमनशांती कायम राहील याची ग्वाही दिली

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर अखेगावकर यांनी तर सूत्रसंचालन गणेश गुरव तसेच आभार ए एस आय हेमंत सांगळे  ,पो कॉ बाळू मराठे,राजेश बऱ्हाटे, होमगार्ड श्रीकांत इंगळे, सह पोलिस वृंद यांनी अथक परिश्रम घेतले
याप्रसंगी  भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते, काँग्रेस शहराध्यक्ष शेख रियाज मेम्बर , राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अनवर खाटीक, पत्रकार  फारूक मनियार, पत्रकार योगेश सोनवणे, प्रा. राजेंद्र राजपूत, माजी नगरसेवक संजय रल, देवेंद्र साळी, शेख कुर्बान , कलीम खान मनियार, शेख जफर, प्रभाकर सपकाळे यासह शहरातील सर्व धार्मिक स्थळांचे धर्मगुरू चालक मालक राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here