भुसावळात नुपूर महोत्सवात नृत्यश्री पुरस्कार प्रदान

0
2

भुसावळ : प्रतिनिधी
दरवर्षी प्रमाणे यंदाही नुपूर महोत्सवाचे आयोजन महाशमहाशिवरात्री मंगळवार दि .१ मार्च रोजी बि. व्ही. खाचणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन बाजारपेठ पोलिस स्टेशनचे राहुल गायकवाड, झुंजार लेवा समाज सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आरुण पाटील, संस्कृत शिक्षक ब्रजेश पंडीत, तसेच पाहुणे कलाकारांच्या हस्ते दिपप्रज्वलन व नटराज पुजन करुन झाले. प्रास्ताविक नुपूर चे संचालक रमाकांत भालेराव यांनी केले त्यात आता पर्यंतच्या प्रवासावर उजेड टाकतांना नुपूर च्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी नृत्यशिक्षीका चारु भालेराव मंचावर उपस्थित होत्या.या वर्षी महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने गेल्या कालावधीत ज्यांनी मदत करणार्यांचा व सहभागी कलावंतांचा स्मृतिचिन्ह देउन सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे भरतनाट्यम कलाकार पलक उपाध्याय ,प्रार्थना तिवारी तसेच शर्मिष्ठा घोष ( मोहिनीअट्टम, भिलाई )यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देउन नृत्यश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. सादरीकरण करतांना मैत्री मालवीय हीने देवी स्तुती सादर केली. नंतर शर्मिष्ठा घोष हिने कुचिपुडी नृत्य सादर केले. नंतर नीयती राणे व उर्वशी कोळी यांनी कथक नृत्यातुन त्रिताल सादर केला.भरतनाट्यम हा प्रकार पलक उपाध्याय यांनी सादर करुन रसिकांची मने जिंकली. नुपूर भालेराव हिने शिवतांडव स्तोत्र सादर करुन रसिकांची दाद मिळवली.

प्रार्थना तिवारी हिने भरतनाट्यम सादर केले. नंतर मैत्री मालविय हीने कथक सादर केले. शर्मिष्ठा घोष हिने मोहिनीअट्टम सादर केले.नुपूर च्या विद्यार्थिनी निलम धाडसे, मेघा कुळकर्णी , सीमा पाठक, उर्वशी कोळी, नीयती राणे, हेमांगी पंडागरे यांना साहवेना आनुराग व ईलु सा हा देह या गाण्यावर कथक सादर केले. शेवटी पलक उपाध्याय व प्रार्थना तिवारी यांनी भरतनाट्यम सादर केले. सुत्रसंचलन प्रा.गिरिष कुळकर्णी यांनी केल. यावेळी सामाजिक उपक्रमांतर्गत झाडांची रोप वितरित करण्यात आलि. हि वितरण व्यवस्था पर्यावरण जागरण मंच, शैक्षीक आगाज, व समता फाउंडेशन, मुंबई यांच्यातर्फे नाना शंकर पाटील, सुरेंन्द्रसिंग पाटील यांनी चोख सांभाळली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम यशस्वितेसाठी राजेंन्द्र जावळे, शुभम कुळकर्णी , शंभु गोडबोले, प्रांजल कुळकर्णी , विकी चव्हाण, नाना शंकर पाटील, सुरेंन्द्रसिंग पाटील, राहुल पाटील, प्रकाश फेगडे, आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here