भारतीय जनता पार्टीतर्फे गांधी जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

0
2
भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्यावतीने 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोंबरपर्यंत सेवा समर्पण अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून उद्या दि 2 ऑक्टोंबर शनिवार रोजी महात्मा गांधी,व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भाजपा जिल्हा महानगरतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ८ वाजता महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळयाला माल्यार्पण करण्यात येईल, फुले मार्केट परीसर येथे स्वछता अभियानाची सुरवात ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, स्थायी सभापती राजेंद्र घुगे – पाटील, गटनेते भगत बालाणी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात येईल तसेच खालील प्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे

मंडल क्र २ सकाळी ०७.वाजता सुभाषचंद्र बोस पुतळा येथे स्वच्छता मोहीम
सकाळी ०७.३० – शिवाजी महाराज पुतळा शिवाजी नगर स्वच्छता मोहीम
सकाळी अन्ना भाऊ साठे यांच्यापुतळा स्वच्छता मोहीम ओबीसी आघाडी
सकाळी ०८ ३० वाजता
लालबहादूर शास्त्री जयंती
सकाळी ०९.०० गांधी उद्यान येथे हार माल्यार्पण

ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे,महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाजपच्या सर्व जिल्हा पदाधिकारी नगरसेवक मंडल अध्यक्ष व कार्यकर्ते यांनी वरील कार्यक्रमास उपस्थिती द्यावी असे आवाहन जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ.राधेशाम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे अभियान प्रमुख राहुल वाघ, सहप्रमुख महेश चौधरी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here